HS Prannoy Dainik Gomantak
क्रीडा

Australia Open 2023: कमबॅक करत शेवटपर्यंत झुंज दिली, पण एचएस प्रणॉय फायनलमध्ये पराभूत

HS Prannoy: ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये एचएस प्रणॉयला अखेरच्या क्षणी पराभव स्विकारावा लागला.

Pranali Kodre

HS Prannoy lost to China Weng Hong Yang in Australian Open 2023 final:

भारताचा स्टार बॅडमिंटन एचएस प्रणॉयला ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.

शेवटपर्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात प्रणॉयला 9-21, 23-21, 20-22 अशा फरकाने चीनच्या वेंग होंग यांग विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

31 वर्षीय प्रणॉयला या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली नव्हती. त्याच्यावर पहिल्याच गेममध्ये वेंग होंग यांगने वर्चस्व ठेवले होते. त्यामुळे वेंग होंग यांगने पहिला गेम 21-9 असा सहज जिंकला.

पण प्रणॉयने दुसऱ्या गेममध्ये शानदार पुनरागमन केले. पण वेंग होंग यांगने या गेममध्येही चांगला खेळ करत 15-15 अशी बरोबरी साधली. त्यानंतरही दोघांमध्ये चूरस शेवटपर्यंत राहिली. अखेर प्रणॉयने हा गेम 23-21 असा जिंकला आणि सामना बरोबरीत आणला.

त्यामुळे तिसरा गेम निर्णायक ठरला. तिसऱ्या गेममध्येही दोघांमध्ये तगडी लढत सुरू होती. पण प्रणॉयने वेंग होंग यांगच्या चुकांचा फायदा घेत 19-14 अशी आघाडी घेतली होती. पण वेंग होंग यांगने शानदार पुनरागमन केले. वेंग होंग यांगने सलग 4 पाँइंट जिंकले.

त्यानंतर 20-19 असा सामना असताना प्रणॉयने तीन पाँइंट्स गमावले त्यामुळे वेंग होंग यांगने हा गेम जिंकत विजेतेपदही जिंकले. दरम्यान, या स्पर्धेतील निकाल पॅरिस 2023 ऑलिम्पिकसाठी खेळाडूंच्या पात्रता क्रमवारीत ग्राह्य धरला जाणार आहे.

तसेच प्रणॉय आणि वेंग होंग यांग यांच्यात मलेशिया मास्टर्समध्ये यापूर्वी सामना झाला होता, ज्यात प्रणॉयने विजय मिळवत विजेतेपद जिंकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize: 2025 वर्षाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल मेरी ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुशी यांना जाहीर

"गोव्यात सुविधांचा आनंद घ्या, दिल्लीत तुम्ही हे करू शकला नाहीत", केजरीवालांना भाजपचा टोला; Post Viral

भाजपाचे बुराक! गोव्यातील खराब रस्त्यांबाबत 'आप'ने CM प्रमोद सावंतांना पाठवली एक लाख पत्र; अरविंद केजरीवालांचाही सहभाग

रतन टाटांच्या लाडक्यानं वेधलं लक्ष! सेंट फ्रान्सिस ऑफ असिसीच्या चर्चमध्ये ‘गोवा’ची उपस्थिती ठरली भावूक; Watch Video

Viral Video: 15 बायका, 30 मुलं आणि 100 सेवक! राजा 'मस्वाती' शाही लवाजम्यासह अबू धाबी विमानतळावर दाखल; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT