Badminton World Federation Rankings: एचएस प्रणॉय ठरला जगातील सातवा शटलर, पीव्ही सिंधूलाही झाला मोठा फायदा!

BWF: ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनीही दोन स्थानांनी प्रगती करत जागतिक क्रमवारीत 15 व्या क्रमांकाची महिला दुहेरी जोडी बनली आहे.
HS Prannoy
HS Prannoy Dainik Gomantak
Published on
Updated on

Badminton World Federation Rankings: भारताचा स्टार शटलर एचएस प्रणॉय मंगळवारी जाहीर झालेल्या ताज्या बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) क्रमवारीत सातव्या स्थानावर पोहोचला आहे.

तर राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेती ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनीही दोन स्थानांनी प्रगती करत जागतिक क्रमवारीत 15 व्या क्रमांकाची महिला दुहेरी जोडी बनली आहे.

सर्वोत्तम मानांकित भारतीय एकेरी खेळाडू

प्रणॉयचे 17 टूर्नामेंटमधून 66,147 गुण आहेत. विशेष म्हणजे, तो सर्वोत्तम रँकिंगचा भारतीय एकेरी खेळाडू आहे.

त्यापाठोपाठ दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूचा (PV Sindhu) क्रमांक लागतो, ती महिला एकेरीत 11व्या स्थानावर आहे.

पुरुष एकेरीतील इतर भारतीयांमध्ये लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत यांचा समावेश आहे, ते अनुक्रमे 22 व्या आणि 23 व्या क्रमांकावर आहेत. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी सातव्या स्थानावर आहेत.

HS Prannoy
PV Sindhu: ऑलिम्पिक मेडल जिंकवून देणाऱ्या कोचला सिंधूने हटवले! जाणून घ्या कारण

टॉप 20 मध्ये दुसरा भारतीय नाही

दरम्यान, कोणत्याही भारतीयाला टॉप 20 मध्ये स्थान मिळालेले नाही. सुदिरमन चषक स्पर्धेत मलेशियाकडून भारतीय मिश्र संघाचा पराभव झाल्यानंतर BWF ने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे.

क गटातील पहिल्या सामन्यात चायनीज तैपेई (1-4) आणि दुसऱ्या सामन्यात मलेशिया (5-0) कडून पराभूत होऊन भारतीय संघ सुदिरमन चषकातून बाहेर पडला. भारताचा (India) तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

8th Pay Commission Latest Update
8th Pay Commission and One Rank One Pension for civilian employees
Aarush Pawaskar World Junior Ranking
Tulunadu History
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com