Goan athletes
Goan athletes Dainik Gomantak
क्रीडा

Olympics World Games : गोव्यातील स्पेशल ॲथलीट्सकडून पदकांची अपेक्षा

किशोर पेटकर

बर्लिन येथे होणाऱ्या स्पेशल ऑलिंपिक्स वर्ल्ड गेम्समध्ये भारतीय संघात निवड झालेल्या गोमंतकीय क्रीडापटूंकडून पदकांची अपेक्षा आहे. त्याबाबत ‘स्पेशल ऑलिंपिक्स भारत’चे राष्ट्रीय क्रीडा संचालक व्हिक्टर वाझ आशावादी आहेत.

बर्लिन येथे 17 ते 25 जून या कालावधीत स्पर्धा होईल. भारताचे 280 खेळाडू, 54 प्रशिक्षक, 20 सहाय्यक स्टाफ सहभाग होत असून ते देशभरातील 22 राज्यांतील आहे. भारतीय संघात 23 गोमंतकीय आहेत. गोव्यातील खेळाडूंना सांघिक गटात दोन, तर वैयक्तिक गटात दोन अशी किमान चार पदके मिळण्याची शक्यता आहे. बर्लिन येथे 17 जून रोजी ऑलिंपिक स्टेडियमवर स्पर्धेस सुरवात होईल. एकूण 26 विविध खेळांत जगभरातील सात हजाराहून जास्त क्रीडापटूंचा सहभाग असेल.

सरावात सर्वोत्तम सुविधांसाठी प्राधान्य

गोव्यातील खेळाडूंनी दोन गटात पणजी व मडगाव येथे सराव केला. प्रवास व इतर बाबींवरील खर्च कमी करताना खेळाडूंनी आपापल्या भागात सराव करण्यास प्राधान्य दिले. सर्व खेळाडू सात जून रोजी नवी दिल्ली येथील चार दिवसीय अंतिम सराव सत्रात भाग घेतील व 12 जून रोजी बर्लिनला रवाना होतील.

‘‘आम्ही राज्यातील खेळाडूंना पणजी व मडगाव येथे सर्वोत्तम सराव सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. आता पदकांसह घरी परतण्यासाठी खेळाडूंना त्यांचा दर्जा उंचवावा लागेल,’’ असे व्हिक्टर वाझ यांनी सांगितले.

बहुक्रीडाप्रकारातील स्पर्धेत सहभागी होणे हे एकप्रकारे आव्हानात्मक असते. अडथळ्यांवर मात करण्यासाठी आम्हाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, तसेच डॉ. मल्लिका नड्डा यांच्या अध्यक्षतेखालील स्पेशल ऑलिंपिक भारत यांच्याकडून भक्कम पाठबळ लाभले, असे वाझ यांनी नमूद केले.

गोमंतकीय खेळाडूंचा सहभाग असलेले खेळ

फुटबॉल, फुटसाल, व्हॉलिबॉल, पॉवरलिफ्टिंग, रोलर स्केटिंग, हँडबॉल, बास्केटबॉल, ज्युदो, व्हॉलिबॉल, ट्रॅक अँड फिल्ड, सायकलिंग व बीच व्हॉलिबॉल.

पदकाची संधी असलेले गोव्यातील खेळाडू

भारताच्या सेव्हन-अ-साईड महिलांच्या युनिफाईड फुटबॉल संघात गोव्याची गायत्री फातर्पेकर गोलरक्षक आहे, तर पुरुषांच्या फुटबॉल संघात फ्रान्सिस परिसापोगू बचावपटूच्या जागी खेळेल. वैयक्तिक गटात आसिफ मलानूर ४०० मीटर, ८०० मीटर आणि ४ बाय ४०० रिले शर्यतीत भाग घेईल. सिया सरोदे महिलांच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत खेळेल. या गोमंतकीय खेळाडूंना पदके जिंकण्याची अधिक संधी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

SCROLL FOR NEXT