MS Dhoni Stumping: 0.12 sec... गिलचा काटा काढायला लागला एवढा वेळ; एकदा व्हिडिओ पाहाच

IPL 2023 फायनलमध्ये सुरुवातीलाय धोनीची यष्टीरक्षणातील चपळाई पुन्हा पाहायला मिळाली.
MS Dhoni Stumping
MS Dhoni StumpingDainik Gomantak
Published on
Updated on

MS Dhoni Stumping: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात अंतिम सामना सुरू आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात सुरुवातीलाच चेन्नई सुपर किंग्सचा यष्टीरक्षक कर्णधार एमएस धोनीची यष्टीमागे चतुराई पाहायला मिळाली.

या सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चेन्नईचा संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी उतरला होता. तर गुजरातकडून शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा हे सलामीला उतरले होते.

MS Dhoni Stumping
MS Dhoni Last Match: धोनीबाबत 2019 वर्ल्डकपचीच IPL मध्येही होणार पुनरावृत्ती? त्या घटनेने फॅन्स इमोशनल

या दोघांनीही गुजरातला दमदार सुरुवात करून देताना अर्धशतकी भागीदारीही रचली. त्यातच शुभमन गिल 3 धावांवर असताना त्याचा दीपक चाहरकडून झेल सुटला होता. पण ही चूक फार महागात पडली नाही.

कारण 7 व्या षटकात फिरकीपटू रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर तो 39 धावांवर बाद झाला. झाले असे की जडेजाने या षटकातील टाकलेल्या अखेरच्या चेंडूवर गिलने पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला.

पण त्याचवेळी यष्टीरक्षण करणाऱ्या एमएस धोनीने चपळाई दाखवली आणि त्याने लगेचच केवळ 0.12 सेंकदात स्टंपवरील बेल्स उडवल्या. त्यावेळी गिल क्रिजमध्ये नव्हता. त्यामुळे गिला यष्टीचीत होत माघारी परतावे लागले. त्यामुळे त्याची आणि साहा यांच्यातील 67 धावांची भागीदारीही तुटली.

MS Dhoni Stumping
IPL 2023: आयपीएल फायनलमध्ये हार्दिक करणार मोठा रेकॉर्ड नावावर, धोनीची इच्छा असूनही...!

दरम्यान, हा सामना राखीव दिवशी खेळवला जात आहे. रविवारी अहमदाबादमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने हा सामना सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे सोमवारी राखीव दिवशी हा सामना घेण्यात आला.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): वृद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

  • चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक /कर्णधार), दीपक चाहर, मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, महिश तिक्षणा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com