Team India Dainik Gomantak
क्रीडा

Ind vs NZ: टीम इंडियाचा वनडे मालिकेवर कब्जा, न्यूझीलंडचा शेवटच्या सामन्यात सुपडासाफ

Team India: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना इंदूरमध्ये खेळला गेला.

दैनिक गोमन्तक

Ind vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना इंदूरमध्ये खेळला गेला. हा सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत पाहुण्या संघाचा सफाया केला आहे. पाकिस्तानविरुद्ध 2-1 ने एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर किवीज येथे आले होते, परंतु यजमान भारतासमोर त्यांची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. टीम इंडियाने हा सामना 90 धावांच्या फरकाने जिंकून मालिका 3-0 ने जिंकली.

दरम्यान, या सामन्यात न्यूझीलंडसमोर (New Zealand) विजयासाठी 386 धावांचे लक्ष्य होते, परंतु संघ 41.2 षटके खेळून 295 धावांवर सर्वबाद झाला आणि 90 धावांच्या फरकाने सामना गमावला. या सामन्यात न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून 385 धावा केल्या.

तसेच, भारतीय संघात 2 बदल करण्यात आले, तर न्यूझीलंडने एक बदल केला होता. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांना भारतीय संघात स्थान मिळाले नाही, त्यांना विश्रांती देण्यात आली. त्यांच्या जागी उमरान मलिक आणि यजुवेंद्र चहलला संधी देण्यात आली. नागपुरात 9 फेब्रुवारीपासून पहिला कसोटी सामना खेळवला जाणार असल्याने शमीने लाल चेंडूने सरावही सुरु केला आहे.

दुसरीकडे, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनीही अवघ्या 25 षटकांत 200 चा टप्पा पार केला होता. रोहितने 83 चेंडूत शतक पूर्ण केले, तर गिलने 73 चेंडूत शतक पूर्ण केले. रोहित आणि गिलनंतर ईशानही बाद झाला. हार्दिकने 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने शतक झळकावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

SCROLL FOR NEXT