Maha Andolan: आझाद मैदानावर शेकडो नागरिक एकवटले! 39 A विरोधात महाआंदोलन; पोलिसांचा कडेकोट पहारा

Azad Maidan Panaji protest: आंदोलन तीव्र झाल्यानंतर पोलिसांनीही आक्रमक भूमिका घेत, कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या आमदार बोरकर यांच्यासह इतर कार्यकत्यांना तेथून हटवले.
Goa 39 A Protest | Maha Andolan
Goa 39 A Protest | Maha AndolanDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नगरनियोजन कायद्यातील (टीसीपी) कलम '३९ अ' रद्द करण्याची मागणी करीत रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचे (आरजीपी) आमदार विरेश बोरकर यांनी पणजीतील आझाद मैदानावर सोमवारी छेडलेल्या महा आंदोलनाला राज्यातील अनेक भागांतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आंदोलकांच्या दाव्यानुसार सुमारे ४ हजार नागरिकांच्या उपस्थितीत महाआंदोलनास सुरुवात झालेली आहे. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आझाद मैदानाला कडेकोट पहारा दिला आहे. सरकारने 'टीसीपी'चे कलम ३९ अ' तत्काळ रद्द करावे, अशी मागणी करीत आमदार विरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली आरजीपीचे कार्यकर्ते आणि सांताक्रूज, सांतआंद्रे, चिंबल आदी परिसरातील नागरिकांनी 'टीसीपी'च्या कार्यालयात आंदोलन सुरू केले होते.

हे आंदोलन तीव्र झाल्यानंतर पोलिसांनीही आक्रमक भूमिका घेत, कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या आमदार बोरकर यांच्यासह इतर कार्यकत्यांना तेथून हटवले. त्यात पोलिसांनी बोरकर यांना कार्यालयातून खाली ओढून आणले.

Goa 39 A Protest | Maha Andolan
Land Conversion: 'जमीन रुपांतरणाचे कलम 39A रद्द होणे अशक्य'! मंत्री राणेंचे स्पष्टीकरण; मुख्यमत्र्यांसोबतच्या ‘ट्युनिंग'वर केले भाष्य

त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकत्यांनी पणजीतील आझाद मैदानावर जाऊन ठाण मांडले. सरकार आपले म्हणणे ऐकण्यास तयार नसल्याचे लक्षात येताच या कार्यकर्त्यांनी सोमवारी महाआंदोलनाची हाक दिली. या आंदोलनाला काँग्रेस, आप आणि गोवा फॉरवर्डच्या आमदारांनीही पूर्ण पाठिंबा दिला.

Goa 39 A Protest | Maha Andolan
Panaji Casino Protest: 'गोव्यातून कॅसिनो हटवा'! पणजीवासियांनी आवळली मूठ; जनआंदोलन, न्यायालयीन लढा सुरु

विरोधकांच्या ११ बसेस अडवल्या अन् सोडल्या

आप आमदार वेंझी व्हिएगश, कूज सिल्वा यांच्या मतदारसंघांतील नागरिक ज्या बसेसमधून आंदोलनस्थळी येत होते, अशा ११ बसेस पोलिसांनी वाटेत अडवल्या होत्या. अखेर वेंझी आणि कूज यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्यांच्या बसेस सोडण्यात आल्या, काँग्रेस, गोवा फॉरवर्डच्या आमदारांच्या मतदारसंघांतूनही नागरिकांना आंदोलनस्थळी आणण्यासाठी बसेसचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com