Team India X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: टीम इंडियाने डावाने जिंकली धरमशाला कसोटी, इंग्लंडने स्पिनर्सपुढे टेकले गुडघे; रुटची एकाकी झुंज अपयशी

India won 5th Test: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध धरमशाला येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी विजय मिळवत मालिकाही नावावर केली.

Pranali Kodre

India won 5th Test by an inning and runs against England in Dharamsala

भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी (9 मार्च) धरमशाला येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला. या सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी मिळवलेल्या विजयामुळे भारताने पाच सामन्यांची ही मालिका ४-१ अशी जिंकली.

धरमशाला येथे झालेल्या पाचव्या कसोटीत भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 124.1 षटकात 477 धावांवर संपला होता. त्यामुळे भारतीय संघाने 259 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर इंग्लंड संघ फलंदाजीला उतरला.

मात्र, भारतीय फिरकीपटूंनी टाकलेल्या जाळ्यात इंग्लंडचे फलंदाज एक-एक करत अडकत गेले. दरम्यान जो रुटने अर्धशतक करत चांगली झुंज दिली होती. पण त्यालाच कुलदीप यादवने 49 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद केले आणि इंग्लंडचा दुसरा डाव १९५ धावांवर संपवला.

इंग्लंडचा संघ तिसऱ्या दिवशी पहिल्या तासातच दुसऱ्या डावात फलंदाजीला आला होता. पण पहिल्या 10 षटकातच आर अश्विनने खेळपट्टीवर मिळणाऱ्या बाऊन्सचा उपयोग करत इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रावली आणि बेन डकेट यांच्यासह ऑली पोपलाही बाद केले आणि भारताला मोठे यश मिळवून दिले होते.

त्यानंतर 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टोने जो रुटला साथ देताना आक्रमक खेळ केला होता. परंतु त्याचा अडथळा कुलदीप यादवने दूर केला. बेअरस्टोने 31 चेंडूत 39 धावांची खेळी केली. यानंतर तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र संपण्यापूर्वी अश्विनने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सलाही 2 धावांवरच त्रिफळाचीत करत इंग्लंडला मोठा धक्का दिला.

दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच अश्विननेच बेन फोक्सला 8 धावांवर बाद करत त्याच्या 5 विकेट्स पूर्ण केल्या. यानंतर 35 व्या षटकात रुटला साथ देणाऱ्या टॉम हर्टलीला जसप्रीत बुमराहने गोलंदाजीला येत पायचीत केले. याच षटकात बुमराहने मार्क वूडलाही माघारी धाडले.

परंतु, 8 विकेट्सनंतरही युवा बशीरने रुटला साथ देताना 9 व्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली होती. अखेर ही भागीदारी रविंद्र जडेजाने तोडली. जडेजाने बशीरला 13 धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर जो रुटला कुलदीपने बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रुटने 128 चेंडूत 12 चौकारांसह 84 धावांची खेळी केली.

भारताकडून या डावात आर अश्विनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आणि रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी भारताचा पहिला डाव 477 धावांवर संपला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 162 चेंडूत 103 धावांची खेळी केली. तसेच शुभमन गिलने 150 चेंडूत 110 धावांची खेळी केली.

याशिवाय यशस्वी जयस्वालने 57 धावांची खेळी केली, तर सर्फराज खानने 56 धावांची खेळी केली, तसेच देवदत्त पडिक्कलने 65 धावांची खेळी केली.

इंग्लंडकडून या डावात शोएब बशीरने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स अँडरसन आणि टॉम हार्टली यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. बेन स्टोक्सने 1 विकेट घेतली.

त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव 57.4 षटकातच 218 धावांवर संपला होता. इंग्लडकडून सलामीवीर झॅक क्रावलीने सर्वाधिक 79 धावांची खेळी केली. पण बाकी कोणाला खास काही करता आले नाही.

भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विनने 4 विकेट्स घेतल्या, तर रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT