Team India | IND vs BAN, 1st Test
Team India | IND vs BAN, 1st Test Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN, 1st Test: भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय, 8 विकेट्ससह कुलदीप ठरला विजयाचा नायक

Pranali Kodre

IND vs BAN, 1st Test: बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात चितगाव येथे कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने रविवारी 188 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कुलदीप यादवला या सामन्याचा सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने दोन्ही डावात मिळून 8 विकेट्स घेतल्या.

भारताने दिलेल्या 513 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला दुसऱ्या डावात 113.2 षटकांत सर्वबाद 324 धावाच करता आल्या. त्यामुळे बांगलादेशला हा सामना पराभूत व्हावा लागला. दरम्यान, केएल राहुलसाठी हा कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी विजय ठरला आहे.

रविवारी या सामन्याच्या पाचव्या दिवशी बांगलादेशने 6 बाद 272 धावांपासून खेळण्यास सुरूवात केली. त्यावेळी कर्णधार शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराझ फलंदाजी करत होते. पण मेहदी हसनला दिवसाच्या तिसऱ्याच षटकात मोहम्मद सिराजने बाद केले. पण त्यानंतर शाकिबने आक्रमक पवित्रा स्विकारात काही मोठे फटके खेळले.

मात्र, तो 6 चौकार आणि 6 षटकारासंह 84 धावांवर खेळत असताना कुलदीपने त्याला त्रिफळाचीत करत भारताच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर इबादोत हुसैन आणि तैजुल इस्लाम यांना अनुक्रमे कुलदीप आणि अक्षर पटेलने बाद करत बांगलादेशचा डाव संपवला आणि भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

पण, तत्पूर्वी बांगलादेशकडून पदार्पणवीर झाकीर हसनने 100 धावांची शतकी खेळी केली होती. तसेच नजमुल हसन शांतोने 67 धावांची खेळी केली होती. मात्र त्यांना बांगलादेशला विजय मिळवून देता आला नाही.

भारताकडून दुसऱ्या डावात अक्षर पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने 3 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज, आर अश्विन आणि उमेश यादव यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

तत्पूर्वी या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या. त्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे भारताला 254 धावांची मोठी आघाडी मिळाली होती.

मात्र भारताने फॉलोऑन न देता फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने दुसरा डाव 2 बाद 258 धावांवर घोषित केला होता आणि बांगलादेशसमोर 513 धावांचे आव्हान ठेवले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: गोव्यात सकाळी नऊपर्यंत 13.02 टक्के मतदान

Lok Sabha Election 2024: ''लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसींच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावणार''; CM सावंत यांची ग्वाही

Lok Sabha Election 2024: तिसवाडीत एक लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क; खिस्ती मते ठरणार निर्णायक

Congress Leader Shashi Tharoor: ‘व्‍यक्तिस्‍वातंत्र्य’ अबाधित राहावे; शशी थरूर यांनी लेखक, विचारवंतांशी मडगावात साधला संवाद

Lok Sabha Election 2024: दक्षिण गोव्यात आज विक्रमी मतदानाची शक्यता; विरियातो अन् पल्लवी यांच्यात निकराची लढाई

SCROLL FOR NEXT