IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाची विजयाकडे वाटचाल, पुजारा-गिलच्या शतकाने गाजवला तिसरा दिवस

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे.
Cheteshwar Pujara and Shubman Gill
Cheteshwar Pujara and Shubman GillDainik Gomantak
Published on
Updated on

IND vs BAN, 1st Test: जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव येथे सुरु असलेल्या बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटीचा शुक्रवारी तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवसाखेर बांगलादेशने दुसऱ्या डावात 513 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बिनबाद 42 धावा केल्या आहेत. अद्याप बांगलादेशला 471 धावांची गरज आहे.

बांगलादेश दिडशे धावांत ढेपाळले

या सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा बांगलादेश पहिल्या डावात 8 बाद 133 धावांवर खेळत होता. पण त्यांचा डाव लगेचच 55.5 षटकांत 150 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून बांगलादेशच्या या डावातील अखेरच्या दोन विकेट्स कुलदीप यादव आणि अक्षर पटेलने घेतल्या.

दरम्यान बांगलादेशकडून या डावात एकाही फलंदाजाला 30 धावाही करता आल्या नाहीत. त्यांच्याकडून मुशफिकूर रहीमने सर्वाधिक 28 धावा केल्या. तसेच भारताकडून या डावात कुलदीप यादवने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने 3 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेल आणि उमेश यादवला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

Cheteshwar Pujara and Shubman Gill
IND vs BAN, 1st Test: कमबॅक करताच कुलदीप यादवने रचला नवा विक्रम, कुंबळे-अश्विनला पछाडलं

पुजारा-गिलची शतके

पण, भारताने पहिल्या डावात 254 धावांची आघाडी घेतल्यानंतरही फॉलोऑन देण्याचे टाळले होते. भारताने दुसरा डाव 2 बाद 258 धावांवर घोषित केला. या डावात भारतीय फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली.

शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी सलामीला 70 धावांची भागीदारी केली. मात्र, केएल राहुल 23 धावांवर बाद झाला. पण, त्यांनंतरही गिल आणि चेतेश्वर पुजाराने भारताचा डाव भक्कमपणे सांभाळताना दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची शतकी भागीदारी केली.

या भागीदारीदरम्यान शुभमन गिलने 110 धावांची खेळी केली. 152 चेंडूत ही खेळी करताना गिलने 10 चौकार आणि 3 षटकार मारले. तसेच गिल बाद झाल्यानंतरही चेतेश्वरने आपली लय कायम ठेवत नाबाद 102 धावा केल्या.

त्याने विराट कोहलीबरोबर नाबाद 75 धावांची भागीदारीही केली. त्याचे शतक होताच भारताने दुसरा डाव घोषित केला. दरम्यान, त्यावेळी विराट नाबाद 19 धावांवर खेळत होता. या डावात बांगलादेशकडून खालेद अहमद आणि मेहदी हसन मिराझ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात सर्वबाद 404 धावा केल्या होत्या. भारताकडून पहिल्या डावातही पुजाराने चांगला खेळ करताना 90 धावांची खेळी केली होती. तसेच श्रेयस अय्यरने 86 धावा केल्या होत्या, तर आर अश्विनने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्याचबरोबर ऋषभ पंतने 46 आणि कुलदीप यादवने 40 धावांचे योगदान दिले होते.

बांगलादेशकडून तैजुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराझ यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या होत्या, तर इबादोत हुसैन आणि खालेद अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com