kampel indore Dainik Gomantak
क्रीडा

भारताने थॉमस कप पटकावला; कांपाल इनडोअर स्टेडियममध्ये आनंदाला उधाण

''भारताने थॉमस कप जिंकल्याची घटना रोमांचित करणारी''

Sumit Tambekar

पणजी: भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने ऐतिहासिक थॉमस कप विजेतेपद पटकाविल्यानंतर गोव्यातही जल्लोष झाला. कांपाल-पणजी येथील इनडोअर स्टेडियममध्ये राज्यातील पॅरा बॅडमिंटनपटूंनी सरावातून उसंत घेत, केक कापून विजयोत्सव साजरा केला.

‘‘तब्बल 73 वर्षांनंतर भारताने थॉमस कप जिंकल्याची घटना रोमांचित करणारी आहे. भारतीय बॅडमिंटनसाठी निश्चितच ही ऐतिहासिक आणि सोनेरी घटना आहे. भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वच खेळात चमक दाखवावी ही पॅरा बॅडमिंटनपटू या नात्याने माझी इच्छा आहे,’’ असे गोवा पॅरा बॅडमिंटन समितीचे सदस्य आणि खेळाडू विशांत नागवेकर यांनी सांगितले.

गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव संदीप हेबळे यांनी सांगितले, की ‘‘भारताने ऐतिहासिक विजेतेपद साकार केल्यानंतर सर्वत्र आनंद, जल्लोष आणि उत्सवाचे वातावरण तयार झाले. आमच्यासोबत पॅरा खेळाडूही सहभागी झाले. केक कापण्यात आला. अभिनंदनपर गाणेही म्हणण्यात आले.’’ बँकॉक येथे रविवारी भारताने थॉमस कप स्पर्धेतील चौदा वेळच्या विजेत्या इंडोनेशियाला हरवून प्रथमच करंडकावर नाव कोरले.

‘‘या यशाची तुलना भारताच्या १९८३ मधील क्रिकेट विश्वकरंडक विजेतेपदाशी करावी लागेल,’’असे हेबळे म्हणाले. ‘‘भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने इतिहास घडविला.संपूर्ण संघाच्या परिश्रमातून जादुई कामगिरी साकारली. अब्जावधी भारतीयांचे स्वप्न साकार झाले.

तब्बल ७३ वर्षांनंतर पोडियमवर राष्ट्रीय ध्वज उंचावताना पाहणे ही उल्हसित करणारी भावना आहे. बॅडमिंटनमधील पुढील महासत्ता बनण्यासाठी भारत वेगाने प्रगती साधत आहे. हे विजेतेपद सर्व खेळाडूंना मोठे स्वप्न पाहण्यासाठी निश्चित प्रेरित करेल.’’- अनुरा प्रभुदेसाई, गोमंतकीय आंतराष्ट्रीय बॅडमिंटनपटू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT