Yashasvi Jaiswal Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI, 1st Test: जयस्वालसोबतच 'या' स्टार खेळाडूचंही टीम इंडियाकडून पदार्पण! पाहा पहिल्या मॅचसाठीची Playing-11

India vs West Indies: भारतीय संघाकडून दोन खेळाडूंचे वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून पदार्पण झाले आहे.

Pranali Kodre

West Indies vs India, 1st test, Playing XI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात बुधवारपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली असून पहिला सामना डॉमिनिकामधील रोसौ येथील विंडसर पार्क येथे खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, भारताकडून या सामन्यातून यशस्वी जयस्वाल आणि ईशान किशन यांचे कसोटी पदार्पण झाले आहे. जयस्वालचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण देखील आहे. त्यामुळे जयस्वाल भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा 394 वा खेळाडू आहे.

तसेच ईशानने यापूर्वी भारताकडून वनडे आणि टी20 क्रिकेट खेळले आहे. पण त्याचा कसोटीतील हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे ईशान आणि जयस्वाल 306 आणि 307 वे खेळाडू ठरले आहेत. ईशान यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळेल, तर जयस्वाल सलामीवीर म्हणून खेळेल.

तसेच भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आर अश्विनचेही पुनरागमन झाले आहे. दरम्यान, या सामन्यातून वेस्ट इंडिजकडूनही एलिक अथानाज या 24 वर्षीय अष्टपैलू खेळाडूचे पदार्पण झाले आहे. तसेच वेस्ट इंडिजने राहकीम कॉर्नवॉल आणि जोमेल वॉरिकन या फिरकी गोलंदाजांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

कसोटी चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वला सुरुवात

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात होणारी कसोटी मालिका कसोटी चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेच्या अंतर्गत खेळवण्यात येत आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेतून भारत आणि वेस्ट इंडिज संघही कसोटी चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वातील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन संघ -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज

  • वेस्ट इंडिज - क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), तेजनारायण चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाज, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

SCROLL FOR NEXT