MS Dhoni: 'मी खूप लकी...' धोनीबद्दल ऋतुराज अन् जयस्वालमध्ये रंगल्या गप्पा, पाहा व्हिडिओ

Ruturaj Gaikwad - Yashasvi Jaiswal: बीसीसीआयने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल एमएस धोनीबद्दल गप्पा मारताना दिसले आहेत.
Ruturaj Gaikwad and Yashasvi Jaiswal
Ruturaj Gaikwad and Yashasvi Jaiswal Dainik Gomantak
Published on
Updated on

Ruturaj Gaikwad and Yashasvi Jaiswal talk about MS Dhoni: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि वेस्ट इंडिज संघात 12 जुलैपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून (12 जुलै) डॉमिनिकामध्ये खेळवला जाणार आहे.

दरम्यान, या मालिकेसाठी भारताच्या कसोटी संघात पहिल्यांदाच ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांची निवड झाली आहे. या दोघांचा नुकताच एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघांनीही भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल त्यांचे अनुभव सांगितले आहे.

Ruturaj Gaikwad and Yashasvi Jaiswal
MS Dhoni Birthday: धोनीचं आगळं-वेगळं सेलिब्रेशन, बर्थडे पार्टीची गँग खूपच स्पेशल; व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओमध्ये जयस्वाल म्हणाला, 'मी जेव्हा धोनी सरांना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा माझ्याकडे बोलायला फार शब्द नव्हते. जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीला भेटता, ज्याला तुम्ही लहानपणापासून पाहिलेले असते, तुमच्या अंगावर काटा उभा राहातो. अजूनही माझ्याकडे त्याच्यासाठी शब्द नाहीयेत.'

तसेच ऋतुराजनेही त्याचा अनुभव सांगितला आहे. यावेळी ऋतुराज म्हणाला की तो खूप नशीबवान आहे की त्याला धोनीबरोबर बराच काळ घालवता आला आहे. ऋतुराज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळतो.

Ruturaj Gaikwad and Yashasvi Jaiswal
MS Dhoni: जेव्हा धोनी गातो 'सलाम-ए-इश्क मेरी जान' गाणं, Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल

ऋतुराज म्हणाला, 'मला वाटते मी खूप नशीबवान आहे की त्याच्याबरोबर मला बराच वेळ घालवता आला. मी नेहमीच प्रत्येक सामन्यानंतर त्याचे निरिश्रक केले. खूप खेळाडू त्याला भेटण्यासाठी आणि त्याच्याकडून शिकण्यासाठी, अगदी फक्त त्याच्याशी बोलण्यासाठी इच्छुक असतात.'

'त्यानंतर मला वाटते की मी खूप नशीबवान आहे की मला त्याच्याबरोबर दोन-तीन महिने प्रत्येक दिवस त्याच्याबरोबर घालवता येतो. मी त्याच्याशी कधीही बोलू शकतो आणि मला कधीही गरज लागली, तरी तो पूर्ण वर्षभर उपलब्ध असतो.'

याशिवाय ऋतुराजने त्याच्या कारकिर्दीत धोनीचे मोठे योगदान असल्याचेही त्याने सांगितले. ऋतुराज म्हणाला, 'मला वाटते तो माझ्या कारकिर्दीतील मोठा घटक आहे. तो ज्याप्रकारे जमीनीवर असतो, कामगिरी वर-खाली होत राहाते, पण तुम्ही कसे तटस्त राहाते, असा अनेक छोट्या-छोट्या गोष्टी शिकता आल्या.'

धोनी भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. तो आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com