Surya Kumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

Ind Vs USA: 'मागचा वर्ल्डकप जिंकला पण..'! पहिल्या सामन्याआधी कॅप्टन सूर्यकुमारचे मोठे वक्तव्य; निकालाबाबत म्हणाला की..

T20 Worldcup 2026: गेला विश्वचषक आपण जिंकला आहे आणि यंदा आपण यजमान आहोत, याचा काय परिणाम होणार आहे, असे विचारता सूर्यकुमार म्हणाला, अपेक्षा वाढल्यात.

गोमन्तक डिजिटल टीम

मुंबई: भारत वि. अमेरिका सामन्याबद्दल भारताचा कप्तान सूर्यकुमार यादवने अत्यंत हसतमुख चेहऱ्याने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. गेला विश्वचषक आपण जिंकला आहे आणि यंदा आपण यजमान आहोत, याचा काय परिणाम होणार आहे, असे विचारता सूर्यकुमार म्हणाला, अपेक्षा वाढल्यात, कारण आपण गतविजेते आहोत आणि घरी खेळताना थोडे दडपण असते;

पण त्याच्या बरोबर चाहत्यांचा खूप पाठिंबा असतो त्याचा चांगला परिणाम होतो. आम्ही चाहत्यांना आनंदी करायचा प्रयत्न करत राहणार. त्यांची करमणूक करत राहणार. आम्हाला वर्तमानात राहून खेळावे लागेल तरच अपेक्षित निकाल आमच्या बाजूने लागायची शक्यता वाढेल.

संघाचे नेतृत्व करण्याबाबत तो म्हणाला, कप्तान म्हणण्यापेक्षा एका अत्यंत कौशल्याने भारलेल्या खेळाडूंच्या गटाचा मी नेता आहे, असे मला वाटते. भारतीय संघात प्रचंड गुणवत्ता आहे, याचा विचार करता अशा संघाचे नेतृत्व करायला मिळणे हे भाग्य आहे माझे.

जबरदस्त क्षमता आहे आपल्या संघात. ईशान किशन खूप मस्त लयीत खेळतोय आणि मला आशा आहे तो खेळतोय, तसाच बिनधास्त खेळत राहील. तसेच सध्या भारतीय संघामध्ये अनेक पर्याय आहेत. आपल्याकडे फक्त खूप विचार करून संघ निवडला जातो आणि त्यात बदल करावा लागला तर त्याचे थोडे वाईट वाटेल. पण आमचा संघ सज्ज झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT