Axar Patel Twitter
क्रीडा

IND Vs SL: 'या' खेळाडूचे टीम इंडियात पुनरागमन

या सामन्यासाठी अक्षय पटेल भारतीय संघात सामील झाला आहे.

दैनिक गोमन्तक

भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 12 मार्चपासून बेंगरुळ येते खेळवला जाणार आहे. पहिली कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडियाचे (Team India) खेळाडू उत्साहात आहेत. आता दुसऱ्या कसोटीमध्ये त्यांना विजय मिळवायचा आहे. यामुळे सामण्यापूर्वी भारतीय खेळाडूनी तयारी सुरू केली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मयंक अग्रवाल, उमेश यादव आणि मोहम्मद सिराजसह सर्व खळाडूंनी प्रशिक्षणात भाग घेतला. यावेळी अक्षय पटेल देखील होता.

कसोटी मालिकेतील (Test Match) दूसरा सामना बंगरुळच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी अक्षय पटेल भारतीय संघात सामील झाला आहे. बुधवारी त्यांनी प्रशिक्षक सत्रात भाग घेतला. अक्षयने सराव करतांना गोलंदाजी केली आणि खूप मेहनत घेतली आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांचाही सरावात सहभाग होता.

युवा फलंदाज शुभमन गिलहीराहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली सराव करतांना दिसला. त्याने नेटमध्ये विविध प्रकारचे शॉटस खेळले आणि इतर गोष्टींवरही काम केले. मयंकसोबत हनुमा विहारीही फलंदाजीचा सराव करतांना दिसला. हनुमाने गेल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती.

रवींद्र जडेजाने कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. मोहाली कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात जडेजाने नाबाद 175 धावा काढल्या आहेत. यासोबतच त्याने श्रीलंकेच्या पहिल्या डावात पाच विकेट्सही घेतल्या होत्या. जडेजासोबतच ऋषभ पंतही चांगला खेळला आहे. पण त्याचे शतक राहिले. पंतने 96 धावांची खेळी खेळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT