Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL, 1st T20I: दोन खेळाडूंचं पदार्पण? अशी असू शकते टीम इंडियाची 'प्लेइंग इलेव्हन'

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातून दोन भारतीय खेळाडू पदार्पण करण्याची शक्यता आहे.

Pranali Kodre

IND vs SL, 1st T20I: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 3 जानेवारीपासून तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल.

दरम्यान, या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांसारख्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याकडे संघाचे कर्णधारपद आणि सूर्यकुमार यादवकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

तसेच संघात शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, शिवम मावी आणि मुकेश कुमार हे चार असे खेळाडू आहेत, ज्यांचे अद्याप आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण झालेले नाही. त्यामुळे यांच्यातील कोणाला श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात पदार्पणाची संधी मिळते, हे पाहावे लागेल.

त्यातही सलामीसाठी ईशान किशनसह शुभमन गिलला अंतिम 11 जणांच्या संघात संधी दिली जाऊ शकते. भारतीय संघाकडे ऋतुराज गायकवाडचाही सलामीसाठी पर्याय आहे. पण गिल असताना ऋतुराजला संधी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. तसेच राहुल त्रिपाठीलाही पदार्पणाची संधी मिळू शकते. त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळू शकते.

तसेच मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि संजू सॅमसन हे खेळाडू खेळतील. तसेच अष्टपैलू म्हणून अक्षर पटेललाही संधी मिळू शकते. याबरोबरच कुलदीप यादवही फिरकीची जबाबदारी सांभाळताना दिसू शकतो. तर वेगवान गोलंदाजीसाठी हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांना अंतिम 11 जणांच्या संघात पसंती दिली जाऊ शकते.

पहिल्या टी20 सामन्यासाठी असा असू शकतो भारताचा संभावित 11 जणांचा संघ -

शुभमन गिल, ईशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT