India Test Team  Dainik Gomantak
क्रीडा

SA Vs IND: 31 वर्षे, 9 मालिका! टीम इंडियाला एकही विजय मिळाला नाही; हिटमॅनकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी

South Africa vs India Test Series: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.

Manish Jadhav

South Africa vs India Test Series: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. 2025 मध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची आहे. ही मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ सर्वतोपरी प्रयत्न करतील. भारताला 31 वर्षांनंतर सुवर्ण विक्रम करण्याची मोठी संधी आहे. 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल. याशिवाय, दुसरा सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान खेळवला जाईल.

पहिला सामना 1992/93 मध्ये झाला होता

दरम्यान, 1992/93 मध्ये भारताने पहिला दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. तेव्हापासून भारताने कसोटी मालिकेसाठी 8 वेळा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आहे, मात्र एकदाही त्याला मालिका जिंकता आलेली नाही. भारताला एक कसोटी मालिका अनिर्णित ठेवता आली असली तरी. भारत 2011 मध्ये दक्षिण आफ्रिकेत 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता, जी 1-1 ने अनिर्णित राहिली होती. याशिवाय, दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या सर्व कसोटी मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी मालिकेत भारताला 1-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. 4 सामन्यांच्या या मालिकेत भारताला एकही सामना जिंकता आला नाही.

दोघांमध्ये एकूण 42 कसोटी सामने झाले आहेत

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 15 कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत, त्यापैकी भारताला फक्त 4 कसोटी मालिका जिंकता आल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध 8 कसोटी मालिका जिंकल्या आहेत, तर 3 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. अशा परिस्थितीत आगामी कसोटी मालिका कोणता संघ जिंकतो हे पाहणे बाकी आहे. दोघांमधील शेवटची कसोटी मालिका 2021/22 मध्ये खेळली गेली होती. याच काळात भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही गेला होता. दक्षिण आफ्रिकेने ही 3 सामन्यांची कसोटी मालिका 2-1 ने जिंकली होती. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 42 कसोटी सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 15 सामने भारताच्या नावावर आहेत, तर 17 सामने दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहेत.

भारतात 7 कसोटी मालिका झाल्या आहेत

दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत एकूण 7 वेळा कसोटी मालिकेसाठी भारताचा दौरा केला आहे. यापैकी भारताने 4 मालिका जिंकल्या आहेत, 2 कसोटी मालिका अनिर्णित राहिल्या आहेत, तर एक मालिका दक्षिण आफ्रिकेने जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेने 1999/2000 मध्ये भारताच्या दौऱ्यावर असताना मालिका 2-0 ने जिंकली होती. म्हणजे दक्षिण आफ्रिकेने भारतात येऊन कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे, पण भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत जाऊन कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही, अशा स्थितीत भारताला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT