T20 World Cup 2026, IND VS SA Dainik Gomantak
क्रीडा

IND VS SA: "टॉसचं टेन्शन नाही, आमची गोलंदाजी कोणालाही रोखू शकते", आफ्रिकेविरुद्धच्या महामुकाबल्यापूर्वी कॅप्टन सूर्याची डरकाळी

T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ च्या साखळी फेरीत सलग चार विजय मिळवून अजिंक्य राहिलेला भारतीय संघ आता 'सुपर-८' च्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे.

Sameer Amunekar

टी-२० विश्वचषक २०२६ च्या साखळी फेरीत सलग चार विजय मिळवून अजिंक्य राहिलेला भारतीय संघ आता 'सुपर-८' च्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाशी होणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव कमालीच्या आत्मविश्वासात दिसला. त्याने प्लेइंग इलेव्हनपासून ते खेळपट्टीच्या स्वरूपापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

सामन्यात नाणेफेकीचा कौल किती महत्त्वाचा असतो, या प्रश्नावर सूर्याने स्पष्टपणे सांगितले की, "टॉसला आता गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले जात आहे. जर आम्ही पहिल्या डावात चांगली धावसंख्या उभारली, तर दुसऱ्या डावात दव पडले तरी आमचे गोलंदाज कोणत्याही धावसंख्येचा यशस्वी बचाव करण्यास सक्षम आहेत." भारतीय गोलंदाजांच्या सध्याच्या फॉर्मवर आपला पूर्ण विश्वास असल्याचेच कर्णधाराने या विधानातून अधोरेखित केले आहे.

अभिषेक शर्माच्या फॉर्मवर मोठी प्रतिक्रिया

सलामीवीर अभिषेक शर्माच्या खराब फॉर्मबद्दल विचारले असता सूर्याने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला, "मला त्या लोकांची काळजी वाटते जे अभिषेकबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.

खरं तर मला त्या संघांची जास्त काळजी वाटते ज्यांना भविष्यात अभिषेकचा सामना करायचा आहे. त्याने गेल्या वर्षभरात स्वतःला सिद्ध केले आहे, आता त्याची वेळ आली आहे." या विधानावरून अभिषेकला संघात पूर्ण पाठिंबा असल्याचे आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठ्या बदलांची शक्यता नसल्याचे संकेत मिळाले आहेत.

खेळपट्टी आणि स्पिनर हाताळण्याचे आव्हान

या स्पर्धेतील खेळपट्ट्यांबद्दल बोलताना सूर्याने मान्य केले की काही खेळपट्ट्या आव्हानात्मक होत्या. "वानखेडेपासून सुरू झालेला हा प्रवास आता अहमदाबादपर्यंत पोहोचला आहे. खेळपट्ट्या थोड्या कठीण होत्या, पण आम्ही व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्यास तयार आहोत.

पॉवरप्लेनंतर डाव कसा सावरला पाहिजे आणि फिनिशिंग कशी केली पाहिजे, याचा अनुभव आमच्याकडे आहे," असे सूर्याने नमूद केले. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंना रोखण्यासाठी संघाने विशेष योजना आखल्याचेही त्याने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT