T20 Cricket: दिल्लीचे आव्हान गोव्यासाठी अवघड, 23 वर्षांखालील महिला टी-20 करंडक क्रिकेट स्पर्धेत पराभव

Goa vs Delhi Under 23 Women T20 Match: गोव्यासाठी पूजा कलेल (४-०-११-४) हिची गोलंदाजी दिलासा देणारी ठरली.
Goa vs Delhi Under 23 Women T20 Match
T20 CricketDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्याच्या २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघासाठी दिल्लीने दिलेले १६९ धावांचे लक्ष्य गाठणे अवघड ठरले, त्यामुळे त्यांना टी-२० करंडक क्रिकेट स्पर्धेत ९५ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. एलिट ‘ब’ गट सामना गुरुवारी हरियानातील सुल्तानपूर येथील गुरुग्राम क्रिकेट मैदानावर झाला.

गोव्यासाठी पूजा कलेल (४-०-११-४) हिची गोलंदाजी दिलासा देणारी ठरली. दिल्लीच्या ५ बाद १६८ धावांना उत्तर देताना गोव्याला ८ बाद ७३ धावाच करता आल्या. गोव्याचा गटातील अखेरचा सामना बडोदा संघाविरुद्ध २१ रोजी खेळला जाईल. गोव्याने आतापर्यंत चार सामन्यांत तीन पराभव पत्करले असून एक सामना जिंकला आहे.

Goa vs Delhi Under 23 Women T20 Match
Goa Turtle Conservation: कासवांचे संवर्धनही हवे, पर्यटनावर परिणामही नको; रोहन खंवटेंची संतुलित भूमिकेची अपेक्षा

संक्षिप्त धावफलक : दिल्ली : २० षटकांत ५ बाद १६८ (शिवी शर्मा ९०, श्वेता सेहरावत २५, हर्षिता यादव २-०-१९-०, पूजा यादव ४-०-३४-१, किमया देसाई १-०-१०-०, पूजा कलेल ४-०-११-४, आराधना सरोज ३-०-३५-०, भारती सावंत ३-०-२६-०, तनया नाईक २-०-२६-०, प्रेषा नाईक १-०-७-०) वि. वि. गोवा : २० षटकांत ८ बाद ७३ (हर्षिता यादव ०, पलक आरोंदेकर ०, प्रेषा नाईक १, जोया मीर २२, तनया नाईक नाबाद २२, पूजा यादव ४, हर्षदा कदम १३, आराधना सरोज ०, भारती सावंत ०, पूजा कलेल नाबाद ६, दीक्षा शर्मा ४-२-५-५).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.