India vs South Africa
India vs South Africa Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs SA: भारताने क्लीन स्वीपची संधी गमावली; तिसऱ्या सामन्यात आफ्रिकेची आघाडी

दैनिक गोमन्तक

India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मंगळवारी इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला 49 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. यासोबतच भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप करण्याची संधी गमावली.

दरम्यान, टीम इंडियाने (Team India) या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 2-1 ने पराभव केला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 20 षटकात 3 गडी गमावून 227 धावा केल्या आणि भारताला (India) विजयासाठी 228 धावांचे लक्ष्य दिले. दक्षिण आफ्रिकेसाठी रिले रोसेओने 48 चेंडूंत आठ षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने नाबाद 100 धावा केल्या. 228 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 18.3 षटकात 178 धावांवर ऑलआऊट झाली आणि सामना गमावला.

दक्षिण आफ्रिकेने भारताला 228 धावांचे लक्ष्य दिले होते

रिले रोसेओच्या कारकिर्दीतील पहिल्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध 3 बाद 227 धावा केल्या. रोसेओने 48 चेंडूत आठ षटकार आणि सात चौकारांसह नाबाद 100 धावा केल्या, याशिवाय डी कॉक (68) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 90 धावा आणि ट्रिस्टन स्टब्स (23) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 87 धावा केल्या. अखेरीस डेव्हिड मिलरने अवघ्या पाच चेंडूत नाबाद 19 धावा केल्या.

भारतीय गोलंदाजी जलवा चालला नाही

दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) फलंदाजांनी शेवटच्या आठ षटकात 108 धावा केल्या. भारताचे चार वेगवान गोलंदाज दीपक चहर (चार षटकात 48 धावांत एक विकेट), मोहम्मद सिराज (चार षटकात एकही विकेट न देता 44 धावा), हर्षल पटेल (चार षटकात 49 धावा) आणि उमेश यादव (तीन षटकात) (34 धावांत एक विकेट) खूपच महागडी ठरली.

डी कॉकचा जलवा

भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. डी कॉक सुरुवातीपासूनच लयीत दिसत होता. त्याने मोहम्मद सिराज आणि दीपक चहरच्या गोलंदाजीवर शानदार षटकार ठोकले. दुसरीकडे मात्र, बावुमाने मालिकेतील तिसऱ्या डावात सिराजच्या चेंडूवर पहिली धाव घेतली. त्याचा संघर्ष सुरुच राहिला. मात्र तीन धावा केल्यानंतर उमेश यादवच्या पहिल्याच चेंडूवर तो रोहितकरवी झेलबाद झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

SCROLL FOR NEXT