Rohit Sharma & Babar Azam
Rohit Sharma & Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

ICC World Cup 2023 Tickets: 'या' दिवसापासून मिळणार वर्ल्डकपची तिकिटं; भारत-पाक सामन्यासाठी कधीपासून होणार बुकींग?

Manish Jadhav

ICC World Cup 2023 Tickets: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. याअंतर्गत भारत-पाकिस्तान सामन्यासह 9 सामन्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासोबतच आयसीसीने तिकिटासंबंधी मोठी घोषणा केली. एकदिवसीय विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता 15 तारखेऐवजी एक दिवस आधी म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

अशा प्रकारे तुम्ही तुमची तिकिटे बुक करु शकता

दरम्यान, चाहत्यांना विश्वचषकासाठी तिकिट बुक करायचे असेल तर त्यांना 25 ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. तिकिटांची नोंदणी प्रक्रिया 15 ऑगस्टपासून सुरु होणार असल्याचे आयसीसीने सांगितले आहे. यानंतर 25 ऑगस्टपासून विश्वचषकाच्या सर्व सामन्यांच्या तिकिटांची विक्री सुरु होईल.

दुसरीकडे, 15 ऑगस्टपासून चाहते विश्वचषकाच्या तिकिटांसाठी त्यांची पूर्व-नोंदणी करु शकतात. यामुळे त्यांना तिकिटांबाबत अपडेट मिळत राहील. पूर्व-नोंदणी आणि तिकीट बुकिंगसाठी, www.cricketworldcup.com/register या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तसेच, सामन्याच्या तिकिटांसाठी ICC वेबसाइट व्यतिरिक्त, ऑफिशियल टिकटिंग पार्टनर्सच्या वेबसाइटला भेट देऊन देखील बुकिंग केले जाऊ शकते.

या तारखांना तिकिटांची विक्री केली जाईल...

नॉन इंडिया वार्मअप मॅच आणि नॉन इंडिया इव्हेंट सामन्यांचं तिकीटं 25 ऑगस्ट रोजी मिळणार

गुवाहाटी आणि त्रिवेंद्रम येथे होणाऱ्या भारताच्या सामन्यांची तिकीटं 30 ऑगस्ट रोजी मिळणार

चेन्नई, दिल्ली आणि पुणे येथे होणाऱ्या भारताच्या सामन्यांची तिकीटं 31 ऑगस्ट रोजी मिळणार

धर्मशाला, लखनऊ आणि मुंबई येथे भारताच्या सामन्यांची तिकीटं 1 सप्टेंबर रोजी मिळणार

बंगळुरु आणि कोलकाता येथे होणाऱ्या भारताच्या सामन्यांची तिकीटं 2 सप्टेंबर रोजी मिळणार

अहमदाबाद येथे होणाऱ्या भारताच्या सामन्यांचं 3 सप्टेंबर रोजी मिळणार

उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीच्या सामन्यांचं तिकीट 15 सप्टेंबर रोजी मिळणार

उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत

विश्वचषकादरम्यान, 45 सामन्यांचा समावेश असलेल्या राउंड रॉबिन लीगमध्ये 10 संघ एकमेकांशी भिडतील. प्रत्येक संघ इतर 9 संघांशी राऊंड-रॉबिन स्वरुपात खेळेल, अव्वल चार संघ बाद फेरीसाठी (उपांत्य फेरी) पात्र ठरतील. पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. जर भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर त्याचा उपांत्य सामना मुंबईत होईल.

वानखेडे स्टेडियमवर 2011 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 28 वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी श्रीलंकेचा पराभव केला होता. तसेच, 1987 च्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील विजेतेपदाचा सामना ईडन गार्डन्सने आयोजित केला होता, जो ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.

सराव सामने आणि स्पर्धेची ठिकाणे

विश्वचषकादरम्यान सराव सामन्यांसह एकूण 12 ठिकाणे असतील. ही हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरु, मुंबई आणि कोलकाता आहेत. हैदराबाद व्यतिरिक्त, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरममध्ये 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT