ट्रेंट बोल्टचं कमबॅक! World Cup 2023 पूर्वी महत्त्वाच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची निवड

New Zealand Squad: ट्रेंट बोल्ट न्यूझीलंड संघाकडून तब्बल वर्षभरानंतर वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज आहे.
Trent Boult
Trent Boult Dainik Gomantak

Trent Boult return to New Zealand ODI squad: भारतात 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी आता सर्वच सहभागी संघांची तयारी जोरदार सुरू आहे. या वर्ल्डकपपूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड संघात इंग्लंडमध्ये महत्त्वाची चार सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.

ऑगस्ट - सप्टेंबर दरम्यान न्यूझीलंड संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडला वनडे आणि टी20 मालिका खेळायची आहे. या दोन्ही मालिकांसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा झाली आहे.

आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने न्यूझीलंड चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघात वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि अष्टपैलू काईल जेमिसन यांचे पुनरागमन झाले आहे.

या मालिकेत खेळणारे बरेचसे खेळाडू वर्ल्डकपसाठीच्या संघातही असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बोल्ट आणि जेमिसन यांचे पुनरागमन न्यूझीलंडसाठी सकारात्मक गोष्ट आहे.

Trent Boult
Hardik Pandya: 'तू धोनी होऊ शकत नाही!', हार्दिकने विजयी षटकार मारला, तरीही का भडकले चाहते?

ट्रेंट बोल्टने गेल्यावर्षी विविध टी20 लीग खेळण्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा वार्षिक कराराला नकार दिला होता. त्यानंतर तो न्यूझीलंड संघातून बाहेर होता. पण त्यानंतर आता त्याला जवळपास 12 महिन्यांनी न्यूझीलंडकडून वनडेत खेळताना दिसणार आहे. तो न्यूझीलंडकडून अखेरचा वनडे सामना सप्टेंबर 2022 मध्ये खेळला होता.

तसेच जेमिसन गेल्या काही काळापासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त होता. तसेच त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली. पण आता तो तंदुरुस्त झाला असून न्यूझीलंडकडून खेळण्यास सज्ज झाला आहे.

मात्र, असे असले तरी अष्टपैलू मायकल ब्रेसवेल टाचेच्या वर झालेल्या दुखापतीतून अद्याप सावरत आहे. तसेच मार्क चॅपमन आणि जिमी निशम त्यांच्या पहिल्या अपात्याच्या जन्माच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे त्यांचा या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही.

याशिवाय न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेतून सावरत आहे. त्यामुळे तोही या मालिकेसाठी संघाचा भाग नाही. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत टॉम लेथमच संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

दरम्यान, बोल्ट आणि जेमिसन यांच्या पुनरागमनाबद्दल न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच ते वनडे मालिकेबद्दल म्हणाले, 'इंग्लंड मागील काही काळापासून मर्यादीत षटकांमधील शानदार कामगिरी केली आहे. आम्ही त्यांच्याविरुद्ध वर्ल्डकपपूर्वी खेळण्यास उत्सुक आहोत.'

Trent Boult
Suryakumar Yadav: 'वनडेतील रेकॉर्ड खराबच, पण...' सूर्यकुमारकडून रोहित-द्रविडने दिलेल्या सल्ल्याचा खुलासा

न्यूझीलंडला इंग्लंड दौऱ्यापूर्वी संयुक्त अरब अमिराती (UAE) संघाविरुद्ध 3 टी20 सामने खेळायचे आहेत. या मालिकेसाठीही संघाची निवड झाली आहे. ही मालिका 17 ते 20 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

त्यानंतर न्यूझीलंड इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान टी20 मालिका होईल, तर 8 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान वनडे मालिका होईल.

  • इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघ - टॉम लॅथम (कर्णधार), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, काइल जेमिसन, ऍडम मिल्ने, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, टिम साउथी, विल यंग

  • इंग्लंड आणि युएईविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी न्यूझीलंड संघ - टीम साउथी (कर्णधार), फिन ऍलन (इंग्लंड), आदि अशोक (यूएई), चाड बोवेस (यूएई), मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर (यूएई), डेव्हॉन कॉनवे (इंग्लंड), लॉकी फर्ग्युसन (इंग्लंड), डीन फॉक्सक्रॉफ्ट (यूएई) , मॅट हेन्री (इंग्लंड), बेन लिस्टर (यूएई), काइल जेमिसन, कोल मॅककॉन्ची (यूएई), ऍडम मिल्ने (इंग्लंड), डॅरिल मिशेल (इंग्लंड), जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स (इंग्लंड), रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, टिम सिफर्ट, ईश सोधी (इंग्लंड), ब्लेअर टिकनर (यूएई), विल यंग (यूएई).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com