IND vs PAK Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: पाकड्यांची ना बॅालिंग चालली, ना बॅटिंग! टीम इंडियाच्या 'डबल अटॅक'ने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, 61 धावांनी पराभव

IND vs PAK Live Updates T20 World Cup 2026: आयसीसी टी-20 विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघातील हाय-व्होल्टेज सामना झाला.

Sameer Amunekar

IND vs PAK: पाकड्यांची ना बॅालिंग चालली, ना बॅटिंग! टीम इंडियाच्या 'डबल अटॅक'ने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, धावांनी पराभव

आयसीसी टी-20 विश्वचषकात रविवारी भारत क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट संघ यांच्यात झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने सर्वच आघाड्यांवर वर्चस्व राखत धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारताने १७६ धावांचे आव्हान उभे केले,

त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अचूक व भेदक मारा करत पाकिस्तानचा डाव कोलमडवला. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ दबावाखाली कोसळला आणि अखेर भारताने हा सामना ६१ धावांनी जिंकत विश्वचषकातील आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.

IND vs PAK Live Updates T20 World Cup 2026: पाकिस्तानचा खेळ खल्लास, भारत विजयाच्या उंबरठ्यावर

पाकिस्तानचा खेळ जवळपास खल्लास झाला असून भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले असून अवघ्या ९७ धावांत त्यांचे ९ गडी बाद झाले आहेत. सलग विकेट्समुळे पाकिस्तानचा डाव कोलमडला असून सामना भारताच्या बाजूने झुकलेला दिसत आहे.

IND vs PAK Live Updates T20 World Cup 2026: आधी फलंदाजी अन् आता गोलंदाजी; भारताच्या 'डबल अटॅक'ने पाकड्यांची 'दाणादाण'

आधी फलंदाजीमध्ये दमदार कामगिरी आणि त्यानंतर गोलंदाजीत भेदक मारा करत भारताने या सामन्यात ‘डबल अटॅक’ दाखवला आहे. भारतीय गोलंदाजांच्या अचूक लाइन-लेंग्थसमोर पाकिस्तानचे फलंदाज पूर्णपणे गोंधळले असून त्यांची अक्षरशः दाणादाण उडाल्याचे चित्र आहे. दबावाखाली पाकिस्तानचा डाव सावरण्यात अपयश ठरत असून अवघ्या ९५ धावांत त्यांचे ७ बळी बाद झाले आहेत, त्यामुळे सामना भारताच्या बाजूने झुकताना दिसत आहे.

IND vs PAK Live Updates T20 World Cup 2026: बाबर आझमच्या दांड्या गुल! अक्षर पटेलनं घेतला विकेट

पाकिस्तानला मोठा धक्का बसला असून कर्णधार बाबर आझम बाद झाला आहे. अष्टपैलू अक्षर पटेल याने अचूक टाकलेल्या चेंडूवर बाबरचा बचाव फसला आणि तो बाद झाला. भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध व भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. परिणामी सुरुवातीच्या षटकांतच सामना भारताच्या बाजूने झुकताना दिसत असून पाकिस्तानने अवघ्या ३४ धावांत ४ गडी गमावले आहेत.

IND vs PAK Live Updates T20 World Cup 2026: पाकिस्तानला सुरुवातीलाच सुरुंग! 13 धावांत 3 गडी बाद

सामन्याच्या सुरुवातीलाच पाकिस्तानच्या डावाला मोठा धक्का बसला असून अवघ्या १३ धावांत ३ गडी बाद झाल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर पाकिस्तानचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत, त्यामुळे सुरुवातीच्या षटकांतच सामना भारताच्या बाजूने झुकताना दिसत आहे. पाकिस्तानचे 13 धावांत 3 गडी बाद झाले आहेत.

IND vs PAK Live Updates T20 World Cup 2026: पाकिस्तानला दुसरा मोठा धक्का! बुमराहच्या 'खतरनाक' यॉर्करसमोर सैम अयूब बाद

पाकिस्तानला दुसरा मोठा धक्का बसला असून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या खतरनाक यॉर्करसमोर सलामीवीर सैम अयूब बाद झाला. बुमराहने टाकलेल्या अचूक आणि वेगवान यॉर्करवर सैम अयूब पूर्णपणे गोंधळून गेला आणि त्याचा बचाव अपयशी ठरला. सलग दोन लवकर विकेट्समुळे पाकिस्तानच्या डावावर मोठा दबाव निर्माण झाला असून भारताला सामन्यात निर्णायक आघाडी मिळाली आहे.

IND vs PAK Live Updates T20 World Cup 2026: पाकिस्तानला मोठा धक्का, फरहान शून्यावर बाद

पाकिस्तानला या सामन्यात मोठा धक्का बसला असून सलामीवीर फरहान डावाच्या पहिल्याच षटकांत खाते न उघडताच बाद झाला आहे. हार्दिक पांड्याच्या अचूक टप्प्यावर टाकलेल्या चेंडूवर फरहानने दिलेला फटका थेट रिंकूच्या हातात गेला आणि तो शून्यावर झेलबाद झाला. पाकिस्तानच्या डावाला सुरुवातीलाच धक्का बसला आहे.

IND vs PAK Live Updates T20 World Cup 2026: पाकिस्तानसमोर 176 चे लक्ष्य; आता बुमराह- वरूणची 'मॅजिक स्पेल' चालणार?

भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत १७५ धावा केल्या असून पाकिस्तानसमोर विजयासाठी १७६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताकडून सर्वाधिक धावा ईशान किशनने केल्या. त्याने ७७ धावांची आक्रमक खेळी साकारली.

कर्णधार सूर्यकुमार यादवने ३२ धावांचं योगदान दिलं, तर शिवम दुबेने २७ धावा केल्या. तिलक वर्माने २५ धावांची खेळी केली, तर रिंकू सिंग ११ धावांवर नाबाद राहिला. मधल्या फळीत विकेट्स पडल्या असल्या तरी ईशानच्या खेळीमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

IND vs PAK Live Updates T20 World Cup 2026: पाकिस्तानी गोलंदाजांचा भारतीय फलंदाजांना वेढा, सूर्याचं वादळ रोखलं

पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांसमोर भारताच्या फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळत आहे. नियमित अंतराने गडी बाद होत असल्यानं भारतीय डावाची गती काहीशी मंदावली. १९ षटकांअखेर भारताने ५ गडी गमावत १५९ धावा केल्या आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादव ३२ धावांवर झेलबाद झाला, तर अष्टपैलू शिवम दुबे २२ धावांवर नाबाद खेळत डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

IND vs PAK Live Updates: भारताला चौथा धक्का, पांड्या शून्यावर बाद

भारतीय संघाला चौथा मोठा धक्का बसला असून हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला आहे. सॅम अय्युबच्या १५व्या षटकात भारताला दोन धक्के बसले. याच षटकात तिलक वर्माची विकेटही पडली. तिलक वर्माने २४ चेंडूत २५ धावांची खेळी केली. आतापर्यंत भारताने १५ षटकांत १२७ धावा केल्या आहेत.

IND vs PAK Live Updates: कर्णधार सूर्यासह तिलक मैदानात, चाहत्यांना फटकेबाजीची प्रतिक्षा

कर्णधार सूर्यकुमार यादव आणि युवा फलंदाज तिलक वर्मा सध्या मैदानात असून, दोघांकडून आक्रमक फटकेबाजीची चाहत्यांना मोठी अपेक्षा आहे. संयमी सुरुवातीनंतर आता धावगती वाढवण्याच्या दृष्टीने दोघेही खेळताना दिसत आहेत. आतापर्यंत भारताने १४ षटकांत १२५ धावा करत मजबूत स्थिती निर्माण केली असून, पुढील ६ षटकांत मोठे फटके पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

IND vs PAK Live Updates: टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण, तिलक-सूर्या जोडी मैदानात

नवाजच्या गोलंदाजीतील १२व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर तिलक वर्माने दमदार षटकार ठोकत टीम इंडियाला शतकाचा टप्पा ओलांडून दिला. या षटकारासह भारताच्या १०० धावा पूर्ण झाल्या.

IND vs PAK Live Updates: भारताला दुसरा झटका, ईशान किशन आऊट

सॅम अय्युबनं शानदार गोलंदाजी करत ईशान किशनच्या स्फोटक खेळीला ब्रेक लावला आहे. सॅमच्या गोलंदाजीवर जागा करून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना इशानचा अंदाज चुकला आणि चेंडू थेट स्टंपवर आदळला. त्यामुळे इशान बोल्ड होत माघारी परतला आणि भारताला मोठा धक्का बसला. त्यानं ७७ धावा केल्या. भारताच्या १० षटकानंतर २ बाद ९२ धावा झाल्या आहेत.

IND vs PAK Live Updates: ईशान किशनचा पॉवर शो! पाकिस्तानविरुद्ध 'रौद्र' रूप, 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण

ईशान किशननं आक्रमक शैलीत फलंदाजी करत केवळ 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं असून, ईशानच्या या झंझावाती खेळामुळे भारताच्या डावाला जबरदस्त गती मिळाली आहे. सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर दबाव टाकत त्यानं फटकेबाजी केलीय.

IND vs PAK Live Updates: टीम इंडियाला धक्का, अभिषेक शर्ना शून्यावर बाद

टीम इंडियाला पहिला धक्का बसला आहे. अभिषेक शर्ना शून्यावर बाद झालाय.

T20 World Cup 2026 Live: भारताची प्लेइंग 11

अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

IND vs PAK Live Updates: पाकिस्तानने जिंकला टॉस; भारताला फलंदाजीचे आमंत्रण

पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय फलंदाज फलंदाजी करण्यास उतरणार असून, सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

IND vs PAK Live Updates: भारत-पाक थरार सुरू व्हायला अवघी काही मिनिटं बाकी, थोड्याच वेळात टॉस

भारत-पाक सामन्याचा थरार सुरू व्हायला आता अवघी काही मिनिटं उरली आहेत. थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टॉस होणार असून, मैदानावर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

IND vs PAK Live Match Updates: टीम इंडिया आणि पाकिस्तानचे खेळाडू प्रेमदासा स्टेडियमवर दाखल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यासाठी कोलंबोचे आर. प्रेमदासा स्टेडियम सज्ज झाले आहे. या महामुकाबल्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असून, दोन्ही संघ मैदानात दाखल झाले आहेत.

India vs Pakistan live match updates: भारत-पाक महामुकाबला पावसाच्या विळख्यात?

आयसीसी टी-20 विश्वचषकात आज 15 फेब्रुवारी रोजी भारत क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट संघ यांच्यात हाय-व्होल्टेज सामना आर. प्रेमदासा स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे. हवामान विभागानुसार दिवसा पावसाची शक्यता असून संध्याकाळपर्यंत परिस्थिती सुधारू शकते.

कोलंबोची खेळपट्टी कशी असेल?

आर. प्रेमदासा स्टेडियमवर नवीन चेंडूवर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना स्विंगमुळे फायदा होऊ शकतो. खेळ पुढे जाताच खेळपट्टी मंदावते, त्यामुळे गोलंदाजांना अतिरिक्त मदत मिळते आणि फलंदाजांसाठी मोठे फटके मारणे कठीण होते. येथे फिरकीही प्रभावी ठरते. पाकिस्तानचा उस्मान तारिक आणि भारताचा वरुण चक्रवर्ती निर्णायक भूमिका बजावू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: 'भारत जादूटोणा करुन जिंकतो...', पाकिस्तानी क्रीडा विश्लेषकाचा अजब दावा; चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वर्ल्ड कपमध्येही तेच रडगाणं

IND vs PAK: युवराजचा रेकॉर्ड मोडला, कोहलीच्या क्लबमध्ये एन्ट्री! ईशान किशनचा पाकिस्तानविरुद्ध धमाका; बनला नवा 'सिक्सर किंग'

VIDEO: 10 चौकार 3 षटकार... खतरनाक ईशान किशन! पाकड्यांना धु धु धुतलं, तुफान फटकेबाजी व्हिडिओ पाहा

India vs Pakistan: सुरुवातच डगमगली! अभिषेक शर्मा पुन्हा शून्यावर बाद; सलमान अली आगाच्या गोलंदाजीवर फसला VIDEO

VIDEO: "गोव्यात ओला-उबरला का अडवता?" कॉमेडियनच्या रोखठोक प्रश्नावर टॅक्सी चालकाचं 'लय भारी' उत्तर! व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT