KL Rahul | Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: रोहित-गिलनंतर कोहली-राहुलचाही पाकिस्तानी गोलंदाजांना दणका! वनडेत चौथ्यांदाच झाला 'हा' पराक्रम

India vs Pakistan: आशिया चषक २०२३ स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारताच्या पहिल्या चारही फलंदाजांनी केलेल्या कामगिरीमुळे खास विक्रम झाला आहे.

Pranali Kodre

Asia Cup 2023, India vs Pakistan, Record:

आशिया चषकात 2023 स्पर्धेच्या सुपर फोर फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामना रविवारी सुरू झाला आहे. पण रविवारी पावसामुळे हा सामना पूर्ण न झाल्याने राखीव दिवशी सोमवारी उर्वरित सामना खेळवला जात आहे. दरम्यान, या सामन्यात भारताकडून वरच्या फळीतील फलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे.

दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यामुळे भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे सलामीला फलंदाजीला उतरले.

या दोघांनीही भारताला शानदार सुरुवात मिळवून देताना सलामीला 121 धावांची भागीदारी रचली. मात्र वैयक्तिक अर्धशतकानंतर दोघेही लागोपाठच्या षटकांमध्ये बाद झाले. शादाब खानने 17 व्या षटकात रोहितला फहिम अश्रफच्या हातून झेलबाद केले. रोहितने 49 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह 56 धावांची खेळी केली.

त्यानंतर 18 व्या षटकात पुढच्याच षटकात शुभमन गिलला शाहिन आफ्रिदीने आघा सलमानच्या हातून झेलबाद केले. गिलने 10 चौकारांसह 52 चेंडूत 58 धावांची खेळी केली.

तसेच सोमवारी भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या विराट कोहलीने आणि चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या केएल राहुल यांनी द्विशतकी भागीदारी करण्याबरोबर शतकेही पूर्ण केली. विराटने नाबाद 122 धावा केल्या, तर केएल राहुलने नाबाद १११ धावा केल्या.

त्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये असे चौथ्यांदाच घडले की भारताकडून एकाच डावात पहिल्या चारही फलंदाजांनी 50 धावांचा आकडा पार केला आहे. तसेच पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्यांदा असे घडले आहे.

यापूर्वी, 2006 साली इंग्लंडविरुद्ध इंदूरला झालेल्या वनडेत रॉबिन उथप्पाने 86, राहुल द्रविडने 69, युवराज सिंगने 63 आणि सुरेश रैनाने 53 धावांची खेळी केली होती.

तसेच 2007 साली इंग्लंडविरुद्धच लीड्सला झालेल्या वनडेत सौरव गांगुली (59), सचिन तेंडुलकर (71), गौतम गंभीर (51), आणि युवराज सिंग (72) यांनी अर्धशतके केली होती.

त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजेच 2017 साली पाकिस्तानविरुद्ध बर्मिंगघमला झालेल्या सामन्यात रोहित शर्मा (91), शिखर धवन (68), विराट कोहली (81*) आणि युवराज सिंग (53) यांनी अर्धशतके केली होती.

दरम्यान, सोमवारी भारताने पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 2 बाद 356 धावा उभारल्या आणि पाकिस्तानला 357 धावांचे आव्हान दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT