virat rohit Dainik Gomantak
क्रीडा

India vs New Zealand 5 ODI Series: मिशन वनडे वर्ल्ड कप! 7 वर्षांनंतर टीम इंडिया खेळणार 5 सामन्यांची वनडे मालिका; न्यूझीलंड दौरा जाहीर

India vs New Zealand Tour Schedule 2026: टीम इंडियाच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर झाले असून, क्रिकेट चाहत्यांसाठी ही मालिका अत्यंत रंजक ठरणार आहे.

Manish Jadhav

India vs New Zealand Tour Schedule 2026: टीम इंडियाच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर झाले असून, क्रिकेट चाहत्यांसाठी ही मालिका अत्यंत रंजक ठरणार आहे. न्यूझीलंड क्रिकेटने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या दौऱ्याची सुरुवात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांनी होणार आहे, ज्यामध्ये एकूण पाच सामने खेळवले जातील. टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची वनडे मालिका रंगणार असून दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात दोन कसोटी सामने खेळवले जातील.

या दौऱ्याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे, टीम इंडिया तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानंतर कोणत्याही परदेशी दौऱ्यावर पाच सामन्यांची वनडे मालिका खेळताना दिसणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक कमालीचे व्यस्त झाले. सतत खेळल्या जाणाऱ्या टी-20 लीग आणि आयसीसी टूर्नामेंट्सच्या वाढत्या संख्येमुळे दोन देशांमधील द्विपक्षीय मालिका साधारणपणे तीन सामन्यांपेक्षा जास्त नसावी, असा ट्रेंड सुरु झाला. टीम इंडियाही बऱ्याच काळापासून जास्तीत जास्त तीनच सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. केवळ आयसीसी किंवा आशिया चषक सारख्या स्पर्धांमध्येच टीम इंडियाला सलग वनडे सामने खेळण्याची संधी मिळते. परंतु, या न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडिया सलग 5 बॅक-टू-बॅक वनडे सामने खेळणार आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी टीम इंडियाने (Team India) 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच त्यांच्या मायभूमीत 5 सामन्यांची वनडे मालिका खेळली होती. त्यावेळी टीम इंडियाचे नेतृत्व विराट कोहलीकडे होते. त्या ऐतिहासिक मालिकेत भारताने उत्कृष्ट कामगिरी करत चार सामने जिंकले होते आणि मालिका 4-1 अशा दणदणीत फरकाने आपल्या नावावर केली होती.

त्या 2011 च्या न्यूझीलंड दौऱ्यात कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनी चमकदार कामगिरी केली होती. रोहित शर्माने आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर संपूर्ण मालिकेत 200 पेक्षा जास्त धावा ठोकल्या होत्या, तर मोहम्मद शमीने आपल्या भेदक आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. त्याच्या या शानदार कामगिरीसाठी शमीला 'प्लेअर ऑफ द सिरीज' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा तशाच प्रकारची 5 सामन्यांची मालिका खेळवली जाणार असल्याने, जुन्या आठवणींना उजाळा मिळण्यासोबतच आगामी विश्वचषकासाठी टीम इंडियाची ताकद अजमावण्याची ही नामी संधी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT