Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: T20 मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये बदल; या खेळाडूंना मिळणार संधी

Hardik Pandya: भारताने तिसरा आणि निर्णायक टी-20 सामना जिंकल्यास ही टी-20 मालिका जिंकेल.

दैनिक गोमन्तक

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या नेपियर येथे तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही देशांमधला हा सामना उद्या भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता होणार आहे. पहिल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता, तर दुसरा सामना जिंकल्यानंतर भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता भारताने तिसरा आणि निर्णायक टी-20 सामना जिंकल्यास ही टी-20 मालिका जिंकेल.

या 2 खेळाडूंना Playing 11 मध्ये मिळेल संधी!

न्यूझीलंडच्या (New Zealand) भूमीवर टी-20 मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाचा (Team India) कर्णधार हार्दिक पंड्या सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. T20 मालिका जिंकण्यासाठी हार्दिक पांड्या मोठा निर्णय घेऊ शकतो. पांड्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात दोन धोकादायक खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतो. उमरान मलिक आणि संजू सॅमसनसारख्या खेळाडूंना तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात संधी मिळू शकते.

ईशान किशन-ऋषभ पंतला चांगले निकाल मिळाले नाहीत

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये ईशान किशनसह ऋषभ पंतला (Rishabh Pant) सलामी करण्याची संधी देण्यात आली, पण तो अपयशी ठरला. परंतु ऋषभ पंतची शानदार फलंदाजी पाहता मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याच्याकडून चांगली कामगिरी होण्याची अपेक्षा आहे. सॅमसन हा आणखी एक फलंदाज आहे, ज्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

शुभमन गिलही डावाची सुरुवात करण्याचा दावेदार

वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत शुभमन गिलही डावाची सुरुवात करण्याचा दावेदार आहे, पण संघाने डावाची सलामी देण्यासाठी दोन डावखुऱ्या फलंदाजांची निवड केली आहे. टी-20 सामन्यांनंतर खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेतच त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT