IND vs NZ: सूर्याचा जलवा, रोहित शर्माच्या विक्रमाशी केली बरोबरी

Suryakumar Yadav Century: सूर्यकुमार यादवची बॅट पुन्हा एकदा तळपली.
Suryakumar Yadav
Suryakumar Yadav Dainik Gomantak

Suryakumar Yadav Century: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमारने 111 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 गडी गमावून 191 धावा केल्या. सलामीवीर ईशान किशनने 36 धावांचे योगदान दिले. तर न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज टीम साऊदीने सर्वाधिक 3 बळी घेतले.

भारताने पहिल्यांदा फलंदाजी केली

केन विल्यमसनने (Kane Williamson) नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार क्रमांक-3 वर फलंदाजीसाठी आला. तेव्हा भारताची धावसंख्या 1 बाद 36 अशी होती. डाव संपल्यानंतर सूर्या माघारी परतला तेव्हा धावसंख्या 6 गडी बाद 191 अशी होती. सूर्यकुमारने 51 चेंडूत नाबाद 11 चौकार आणि 7 षटकार ठोकले.

Suryakumar Yadav
IND vs NZ: न्यूझीलंड संघात भीतीचे वातावरण! टीम इंडियात परतला हा 'काश्मीरी वाघ'

रोहितच्या विक्रमाशी बरोबरी

दरम्यान, सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) नियमित कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याने लॉकी फर्ग्युसनच्या डावातील 19 व्या षटकात चौकार मारला आणि शतक पूर्ण केले. या षटकात त्याने 4 चौकार आणि एका षटकारासह एकूण 22 धावा केल्या. अशाप्रकारे, सूर्यकुमार एका कॅलेंडर वर्षात T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये दोन शतके झळकावणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहितने 2018 मध्ये हा विक्रम केला होता.

Suryakumar Yadav
IND vs NZ: 2nd T20 साठी पांड्याची धाकड Playing 11 तयार, या खेळाडूला मिळणार संधी

पंत ओपनिंगमध्ये फ्लॉप झाला

या सामन्यात हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) ऋषभ पंतला सलामीवीर म्हणून संधी दिली. परंतु पंतला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही, त्याने 13 चेंडूंचा सामना करत एका चौकाराच्या मदतीने केवळ 6 धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि कर्णधार हार्दिक पांड्याने 13-13 धावा केल्या. मात्र दीपक हुड्डा आणि वॉशिंग्टन सुंदरला खातेही उघडता आले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com