Virat Kohli and Ishan Kishan Run Out Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: पळायचं की नाही? विराट-ईशानच्या गोंधळात किवींनी साधली रनआऊटची संधी

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत विराट आणि ईशान यांच्यात धाव घेण्यासाठी गोंधळ झाला होता, ज्यामुळे ईशानला विकेटही गमवावी लागली.

Pranali Kodre

India vs New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात इंदोरला तिसरा वनडे सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली होती. दरम्यान, भारताच्या फलंदाजीवेळी यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन विचित्रपद्धतीने धावबाद झाला.

होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी द्विशतकी भागीदारी करत चांगली सुरूवात मिळवून दिली होती. या दोघांनीही वैयक्तिक शतकेही केली. पण शतके केल्यावर हे दोघे लागोपाठच्या षटकांमध्ये बाद झाले.

त्यानंतर भारताचा डाव विराट कोहली आणि ईशान किशन यांनी सांभाळण्यास सुरुवात केली होती. पण या दोघांचीही जोडी खेळपट्टीवर स्थिरावत असतानाच 35 व्या षटकात ईशान धावबाद झाला.

झाले असे की विराट आणि ईशान या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी झाली होती. त्यावेळी 35 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ईशानने कव्हरच्या दिशेने शॉट खेळला आणि तो एकेरी धाव घेण्यासाठी धावला. त्यावेळी नॉन-स्ट्रायकरवर उभा असलेला विराटही धावला. विराट खेळपट्टीच्या अर्ध्यावर पोहचला असताना ईशानने मन बदलले आणि तो मागे फिरला.

त्यानंतर स्ट्रायकर एन्डला दोन्ही खेळाडू पोहचले. त्यावेळी विराटची बॅट आधी क्रिजमध्ये गेल्याने ईशानला त्याची विकेट गमवावी लागली. ईशानने 24 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह 17 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर काहीवेळानंतर विराटही 36 धावांवर बाद झाला.

यानंतर एका बाजूने भारताच्या विकेट्स नियमित कालांतराने जात असताना दुसरी बाजू हार्दिक पंड्याने सांभाळली होती. त्याने यावेळी 54 धावांची अर्धशतकी खेळीही केली. तसेच भारताकडून सलामीलाच रोहित आणि शुभमन यांनी 212 धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात दिली होती. याचा फायदा भारतीय संघाला 350 धावांचा टप्पा पार करताना झाला.

यावेळी रोहितने 101 धावांची खेळी केली, तसेच शुभमनने 112 धावांची खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 385 धावा केल्या. न्यूझीलंडकडून जेकॉब डफी आणि ब्लेअर टिकनर यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच मायकल ब्रेसवेलने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT