Rohit Sharma 30th ODI Century
Rohit Sharma 30th ODI CenturyDainik Gomantak

Rohit Sharma: 'हिटमॅन'ची प्रतिक्षा संपली! तब्बल 1100 दिवसांनी सेंच्यूरी ठोकत साधली पाँटिंगची बरोबरी

रोहित शर्माने तब्बल 1100 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर वनडेत शतकी खेळी केली.

India vs New Zealand ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात मंगळवारी इंदोरमध्ये वनडे मालिकेतील तिसरा सामना झाला. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू रिकी पाँटिंगच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे.

मंगळवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्माने 83 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. पण शतक पूर्ण करताच तो बाद झाला. त्याने 85 चेंडूत 101 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 6 षटकार मारले.

दरम्यान, रोहितचे हे वनडे क्रिकेटमधील 30 वे शतक आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीती 241 व्या वनडे सामन्यात खेळताना हे शतक केले. त्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित पाँटिंगच्या बरोबरीने तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. पाँटिंगनेही वनडे क्रिकेटमध्ये 30 शतके केली आहेत.

Rohit Sharma 30th ODI Century
Shubman Gill: टीम इंडियाच्या प्रिन्सचा डबल धमाका! सचिन, सेहवाग, रोहित सर्वांनाच टाकलं मागे

वनडेत सर्वाधिक शतके झळकावण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. त्याने 49 वनडे शतके केली आहेत. तसेच विराट कोहली 46 वनडे शतकांसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

(Rohit Sharma scored 30th ODI Century and equals Ricky Ponting record)

वनडेत सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू

49 - सचिन तेंडुलकर

46 - विराट कोहली

30 - रोहित शर्मा

30 - रिकी पाँटिंग

28 - सनथ जयसूर्या

Rohit Sharma 30th ODI Century
Rohit Sharma: हिटमॅनचं मोठ्ठं मन! सुरक्षा कडं भेदत मैदानात आलेल्या युवा चाहत्यासाठी केलं असं काही...

तब्बल 3 वर्षांनी रोहितने झळकावले शतक

रोहितला 29 वे वनडे शतक झळकावल्यानंतर 30 वे वनडे शतक झळकावण्यासाठी तब्बल 1100 दिवसांची प्रतिक्षा करावी लागली. त्याने 29 वे वनडे शतक 19 जानेवारी 2020 रोजी केले होते. त्यानंतर त्याने तब्बल 3 वर्षांनी वनडेत शतक केले.

गिलबरोबर द्विशतकी भागीदारी

मंगळवारी रोहित शर्माने शतकी खेळी करताना शुभमन गिलबरोबर द्विशतकी भागीदारीही केली. रोहित आणि शुभमन यांच्यात सलामीला 212 धावांची भागीदारी झाली. ही न्यूझीलंडविरुद्ध सलामीवीरांनी वनडेत केलेली सर्वोच्च धावांची भागीदारीही ठरली. गिलनेही या सामन्यात शतकी खेळी करताना 112 धावांची खेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com