Hardik Pandya and Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ, 2nd T20I: टीम इंडियाचा रडतखडत विजय! शंभरीसाठीही किवी गोलंदाजांनी सतवलं

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध दुसरा टी20 सामना अखेरच्या षटकात जिंकला.

Pranali Kodre

India vs New Zealand, 2nd T20I: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी टी20 मालिकेतील दुसरा सामना पार पडला. लखनऊला झालेल्या या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयामुळे भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी करत मालिकेतील आव्हान कायम ठेवले.

या सामन्यात न्यूझीलंडने 100 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला संघर्ष करावा लागला. पण भारताने अखेरचा चेंडू बाकी ठेवत 4 विकेट्सच्या मोबदल्यात 101 धावा करत सामना जिंकला.

या सामन्यात 100 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताचा सलामीवीर शुभमन गिल 11 धावांवरच चौथ्या षटकात बाद झाला. त्यानंतर ईशान किशन आणि राहुल त्रिपाठी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना आक्रमक शॉट खेळण्यापासून न्यूझीलंडने रोखले होते.

त्यातच ईशान आणि राहुल खेळपट्टीवर स्थिरावत असतानात ४ धावांच्या अंतरात बाद झाले. ईशानने 32 चेंडूत 19 आणि राहुलने 18 चेंडूत 13 धावा केल्या. त्यानंतर 15 व्या षटकात भारताच्या 70 धावा झाल्या असताना वॉशिंग्टन सुंदरही 9 चेंडूत 10 धावा करून धावबाद झाला.

त्यामुळे मैदानात आलेल्या भारताच्या कर्णधार आणि उपकर्णधार म्हणजेच हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर भारताच्या डावाची जबाबदारी आली. पण या दोघेही मोठे फटके खेळत वर्चस्व गाजवणार नाही याची न्यूझीलंड गोलंदाजांनी काळजी घेतली.

त्यामुळे भारतासमोर अखेरच्या षटकात 6 चेंडूत 6 धावा असे समीकरण तयार झाले होते. त्यातही हार्दिक आणि सूर्यकुमार यांना या षटकाच्या पहिल्या चार चेंडूत चार धावाच करता आल्या होत्या. पण अखेर पाचव्या चेंडूवर सूर्यकुमारने चौकार ठोकत भारताचा विजय निश्चित केला. हार्दिक 15 धावांवर आणि सूर्यकुमार 26 धावांवर नाबाद राहिला.

न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेल आणि ईश सोधी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. यांच्याशिवाय न्यूझीलंडच्या अन्य गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीसाठी उतलेल्या न्यूझीलंडलाही संघर्ष करावा लागला. भारतीय गोलंदाजांनीही कमालीची गोलंदाजी करताना न्यूझीलंडला 99 धावांवर रोखण्याचा कारनामा केला.

भारतीय गोलंदाजांनी 10 षटकात 48 धावांवरच न्यूझीलंडच्या 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतरही न्यूझीलंडला प्रत्येक धावेसाठी भारतीय गोलंदाजांनी संघर्ष करायला लावला. अखेरच्या 10 षटकात देखील न्यूझीलंडने नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 20 षटकात 8 बाद 99 धावाच करता आल्या.

न्यूझीलंडकडून कर्णधार मिशेल सँटेनरने सर्वाधिक 19 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला 15 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक हुडा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

विशेष गोष्ट अशी की या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंना एकही षटकार ठोकता आला नाही. आता या टी20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना 1 फेब्रुवारी रोजी अहमदाबादला होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arohi Borde: गोव्याची आरोही बोर्डे चमकली, 68व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले 'गोल्ड'!

Cash For Job Scam: '...सरकारी नोकरी घोटाळ्याला विरोधकही तेवढेच जबाबदार'; 'आयटक' नेते फोन्सेका यांचा हल्लाबोल!

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

SCROLL FOR NEXT