IND vs NZ: नो-बॉलपासून अर्शदीपची सुटका होईना, आता 'हा' नकोसा विक्रमही झाला नावावर

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यादरम्यान अर्शदीपच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
Arshdeep Singh
Arshdeep SinghDainik Gomantak
Published on
Updated on

India vs New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शुक्रवारी रांचीमध्ये टी20 मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात आला. हा सामना भारताने 21 धावांनी गमावला. दरम्यान, भारताच्या पराभवामागे वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टाकेलेले 20 वे षटक देखील कारणीभूत ठरले.

Arshdeep Singh
IND vs NZ: 'टीम इंडियापेक्षा तो एकटाच न्यूझीलंडविरुद्ध खेळत होता', पराभवानंतर कॅप्टन पंड्याचे भाष्य

अर्शदीपने दिल्या तब्बल 27 धावा

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक नो-बॉल टाकण्याचा विक्रम आधीच अर्शदीप सिंगच्या नावावर आहे. त्यातच आता त्याने शुक्रवारी 20व्या षटकात न्यूझीलंडला तब्बल 27 धावा दिल्या. महत्त्वाचे म्हणजे 18 व्या षटकात त्याने केवळ 2 धावा दिल्या होत्या. त्यामुळे तो शेवटच्या षटकातही न्यूझीलंडला कमी धावात रोखेल असे वाटले होते.

मात्र, त्याने अखेरच्या षटकातील पहिलाच चेंडू नो बॉल टाकला. त्यावर डॅरिल मिशेलने षटकार मारला. त्यांनतरच्या दोन्ही चेंडूंवरही मिशेलने षटकार खेचले. त्यानंतर मिशेलने चौकार मारला. त्यामुळे पहिल्या 3 अधिकृत चेंडूंमध्येच तब्बल 22 धावा न्यूझीलंडला मिळाल्या. नंतरच्या तीन चेंडूवर 5 धावा मिळाल्या. त्यामुळे एकूण 27 धावा या षटकात न्यूझीलंडला मिळाल्या.

(Arshdeep Singh conceded 27 runs in 20th Over and made a Unwanted record)

Arshdeep Singh
IND vs NZ: फक्त सूर्याच नाही, तर रोहितसह 'या' भारतीय फलंदाजांनीही टी20 मध्ये खेळल्या 'मेडन ओव्हर'

अर्शदीपच्या नावावर नकोसा विक्रम

अर्शदीपने 20 व्या षटकात 27 धावा दिल्याने तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारा भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला. तसेच 20 व्या षटकात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला. याआधी असा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर होता. रैनाने 30 मार्च 2012 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 सामन्यांत 20 व्या षटकात 26 धावा दिल्या होत्या.

इतकेच नाही, तर अर्शदीप आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एकाच षटकात 25 किंवा त्यापेक्षा अधिक धावा दोन वेळा देणारा पहिलाच भारतीय गोलंदाजही ठरला आहे. त्याने गुवाहाटीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी20 सामन्यात 19 व्या षटकात गोलंदाजी करताना 26 धावा दिल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे भारतीय गोलंदाज

34 धावा - शिवम दुबे (विरुद्ध न्यूझीलंड, 2020)

32 धावा - स्टुअर्ट बिन्नी (विरुद्ध वेस्ट इंडिज, 2016)

27 धावा - अर्शदीप सिंग (विरुद्ध, न्यूझीलंड, 2023)

27 धावा - शार्दुल ठाकूर (विरुद्ध श्रीलंका, 2018)

26 धावा - सुरेश रैना (विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2012)

26 धावा - अर्शदीप सिंग (विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2022)

25 धावा - युवराज सिंग (विरुद्ध न्यूझीलंड, 2007)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com