Washington Sundar Catch
Washington Sundar Catch Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ, 1st T20I: हवेत झेपावत वॉशिंग्टनने पकडला 'सुंदर' कॅच, पाहा Video

Pranali Kodre

India vs New Zealand, 1st T20I: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शुक्रवारपासून तीन सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना रांचीतील झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (जेएससीए स्टेडियम) होत आहे. या सामन्यात भारताचा गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने एक अप्रतिम झेल घेतला.

या सामन्यात भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण न्यूझीलंडचे सलामीवीर फिन ऍलेन आणि डेव्हॉन कॉनवे यांनी काहीशी आक्रमक सुरुवात केली होती. त्यांची जोडी घातक होत होती.

पण, अशा परिस्थितीत भारतीय संघाच्या मदतीला फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर आला. त्याने पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फिन ऍलेनला बाद केले. 23 चेंडूत 35 धावा करून ऍलेन बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला मार्क चॅपमन आला. पण त्यालाही सुंदरने फार काळ टिकू दिले नाही. त्याच्या स्वत:च्याच गोलंदाजीवर अप्रतिम झेल घेतला.

(Washington Sundar Brilliant Catch On His Own Bowling)

सुंदरचा शानदार झेल

पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवेळी चॅपमन फलंदाजीसाठी स्ट्राईकवर उभा होता. त्यावेळी त्याने केवळ तीन चेंडू खेळले होते. त्याच्याविरुद्ध सुंदरने आऊटसाईड ऑफला चेंडू टाकला. ज्यावर चॅपमनने शॉट खेळला, पण त्याचवेळी सुंदरने चपळाई दाखवत त्याच्या उजवीकडे हवेत झेप घेतली आणि एका हाताने चेंडू झेलला.

त्याचा हा झेल पाहून अनेकजण चकीत झाले. दरम्यान, चेंडू पकडताना जमीनीचा स्पर्श झालाय का हे तिसऱ्या पंचांकडून तपासण्यात आले, पण सुंदरने योग्य झेल घेतला असल्याने चॅपमन शुन्य धावेवर बाद झाला. परंतु, सुंदरने घेतलेल्या या झेलाचे सध्या कौतुक होत आहे.

पण, चॅपमन बाद झाल्यानंतर कॉनवेला ग्लेन फिलिप्सने चांगली साथ दिली. त्यांच्यात 60 धावांची भागीदारीही झाली. त्यामुळे 10 षटकात न्यूझीलंड 80 धावांच्या जवळ पोहचले होते.

या टी२० मालिकेत न्यूझीलंड संघाचे नेतृत्व मिशेल सँटेनर करत आहेत. कारण या मालिकेसाठी टीम साऊथी, केन विलियम्सन, टॉम लॅथम हे खेळाडू न्यूझीलंड संघाचा भाग नाहीत.

भारतीय संघातही विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी अशा प्रमुख खेळाडूंचा या मालिकेसाठी समावेश नाही. त्यामुळे भारतीय संघातही अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. तसेच हार्दिक पंड्या नेतृत्व करत आहे, तर सूर्यकुमार यादव उपकर्णधार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT