India vs New Zealand Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: चाहत्यांची चांदी, भारत अन् न्यूझीलंडमध्ये एकाच दिवसात होणार 2 T20 सामने; शेड्यूल पाहून...

India vs New Zealand: दोन्ही देशांच्या चाहत्यांना या दिवशी आणखी एक भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमन्तक

India vs New Zealand T20 Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 मालिकेतील पहिला सामना (IND vs NZ LIVE) 27 जानेवारी रोजी JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रांची येथे खेळवला जाईल. या मालिकेत भारताची कमान हार्दिक पांड्याकडे आहे, तर मिचेल सँटनर न्यूझीलंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दोन्ही देशांच्या चाहत्यांना या दिवशी आणखी एक भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पाहायला मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या सामन्याचे सर्व डिटेल्स...

एकाच दिवसात 2 टी-20 सामने खेळवले जातील

भारत (India) विरुद्ध न्यूझीलंडचा पुरुष संघ 27 जानेवारीला T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. दुसरीकडे, 27 जानेवारी रोजी, T20 विश्वचषक 2023 चा उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड अंडर-19 महिला संघांमध्ये खेळवला जाईल.

याशिवाय, ऑस्ट्रेलियाचा सामना इंग्लंड संघाशी होणार आहे. दोन्ही उपांत्य फेरीतील विजेते रविवारी पोचेफस्ट्रूममध्येच होणाऱ्या अंतिम फेरीत भिडतील.

भारतीय संघ विजयाचा मोठा दावेदार

सुपर सिक्स फेरीच्या सुरुवातीला भारतीय अंडर-19 महिला संघाला ऑस्ट्रेलियाने केवळ 87 धावांवर ऑल आऊट केले होते, परंतु भारतीय अंडर-19 महिला संघाने पुढच्या सामन्यात शानदार पुनरागमन करत श्रीलंकेचा सात विकेट्स राखून पराभव केला होता.

यामध्ये भारताची उपकर्णधार श्वेता सेहरावतची फलंदाजी खूप महत्त्वाची होती. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये ती पाच डावांत 231 धावा करुन दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर, डावखुरी फिरकीपटू मन्नत कश्यप आणि लेगस्पिनर पार्श्वी चोप्रा यांनीही मोलाचे योगदान दिले.

या वेळेपासून हे दोन्ही सामने खेळवले जाणार आहेत

भारतीय महिला अंडर-19 विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) महिला अंडर-19 T20 विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना सेनवेस पार्क, पॉचेफस्ट्रूम येथे खेळवला जाईल. हा सामना दुपारी दीड वाजल्यापासून खेळवला जाईल.

त्याचवेळी, भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ 1st T20) या पुरुष संघांमधील T20 मालिकेतील पहिला सामना JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम रांची येथे होणार आहे. हा सामना सायंकाळी 7 वाजल्यापासून सुरु होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT