India Hockey fans Singing Vande Mataram in Chennai Stadium:
भारतात सध्या आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धा खेळवली जात आहे. ही स्पर्धा चेन्नईमध्ये खेळवली जात आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेशही केला आहे. याच स्पर्धेतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण स्टेडियममध्ये वंदे मातरम गाणे वाजताना दिसत आहे. हा व्हिडिओ रविवारी (6 ऑगस्ट) भारत विरुद्ध मलेशिया संघात झालेल्या सामन्यातील आहे. हा सामना चेन्नईमधील मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर झाला होता.
या सामन्यातील हाफ टाईम संपल्यानंतर स्टेडियममध्ये वंदे मातरम हे गाणे वाजवण्यात आले होते. या गाण्याच्या शब्दांमध्ये सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांनीही आपले सूर मिसळल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.
तसेच यावेळी प्रेक्षकांनी आपल्या मोबाईलची फ्लॅशलाईटही चालू केली होती. हा व्हिडिओ हॉकी इंडियाने सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत. त्याचबरोबर मोठ्याप्रमाणात लाईक्सही आल्या आहेत.
भारताने बलाढ्य मलेशिया संघाविरुद्ध 5-0 असा दणदणीत विजय मिळवला होता. या विजयासह भारताने मलेशियाला पाँइंट्सटेबलमध्ये मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला होता.
मलेशियाविरुद्ध भारताकडून कार्थी सेल्वम (15'), हार्दिक सिंग (32'), हरमनप्रीत सिंग (42'), गुरजंत सिंग (53') आणि जुगराज सिंग (54') यांनी गोल नोंदवले होते.
त्यानंतर भारताने सोमवारी दक्षिण कोरियाचा 3-2 अशा फरकाने पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. त्यापूर्वी भारताने पहिल्या दोन सामन्यांमध्ये चीनविरुद्ध 7-2 असा विजय मिळवला होता, तर जपानविरुद्ध 1-1 अशी बरोबरी स्विकारली होती.
आता या स्पर्धेतील भारताचा अखेरचा साखळी सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हा सामना 9 ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.