Asian Champions Trophy Hockey: भारताने कोरियाला पाजले पराभवाचे पाणी; सेमी-फायनलमध्येही दणक्यात प्रवेश

Indian Hockey Team: आशिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने कोरियाला पराभूत करत तिसऱ्या विजयाची नोंद केली, तसेच सेमीफायनलमधील प्रवेशही निश्चित केला.
Indian Hockey Team
Indian Hockey TeamDainik Gomantak

Indian Hockey Team beat Korea 3-2 in Asian Champions Trophy Chennai 2023:

आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने सोमवारी कोरियाला पराभूत करत तिसरा विजय नोंदवला असून उपांत्य फेरीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. भारतीय संघ चौथ्या सामन्यानंतरही या स्पर्धेत अपराजित असून गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे.

चेन्नईमधील मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सोमवारी भारताने कोरियावर 3-2 अशा फरकाने विजय मिळवला. भारताचे आता 10 गुण झाले असून गुणतालिकेत भारतापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर 9 गुणांसह मलेशिया आहे.

Indian Hockey Team
Asian Champions Trophy Hockey: भारताच्या मोहिमेला दणदणीत विजयानं सुरुवात; पहिल्याच सामन्यात चीनला चारली धूळ

भारताने शानदार सुरुवात केली होती. भारताकडून पहिल्याच क्वार्टरमध्ये निळकंठ शर्माने ६ व्याच मिनिटाला मैदानी गोल करत आघाडी मिळवून दिली.

मात्र, भारतीय संघाला ही आघाडी फार काळ टिकवून ठेवता आली नाही, कारण कोरियाकडून पहिला क्वार्टर संपण्यासाठी अगदी 3 मिनिटे बाकी असताना 12 व्या मिनिटाला सुनघ्यून किमने गोल करत बरोबरी साधली. त्यामुळे पहिल्या क्वार्टरनंतर सामना 1-1 अशा बरोबरीत होता.

त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये सुकुवातीला दोन्ही संघांकडून चांगला खेळ झाला. दरम्यान 23 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्यावर कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताला पुन्हा आघाडीवर आणले. त्यानंतरच्या मिनिटालाही पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, मात्र त्यावर गोल करता आला नाही.

Indian Hockey Team
Asian Champions Trophy Hockey: अपराजित भारताने उडवला मलेशियाचा धुव्वा; पाँइंट टेबलमध्येही नंबर वन

पहिला हाफ संपल्यानतंर भारतीय संघ 2-1 अशा फरकाने पुढे होता. तिसऱ्या क्वार्टरमध्ये सुरुवातीलाच कोरियाला पेनल्टी मिळाली, पण भारताने चांगला बचाव केला. त्याच्या पुढच्याच दोन मिनिटाने म्हणजे सामन्याच्या 33 व्या मिनिटाला मनदीप सिंगने मैदानी गोल करत भारताची आघाडी 3-1 अशी वाढवली.

कोरियाला 36 व्या मिनिटालाही पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, पण त्यांना गोल करता आला नाही. चौथ्या क्वार्टरमध्ये कोरियाने पुनरागमनासाठी मोठे प्रत्न केले. त्यांना जवळपास ९ पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र भारताच्या बचाव फळीने चांगला बचाव केला.

मात्र सामना संपण्यास केवळ 2 मिनिटे शिल्लक असताना जिहुन यांगने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्यामुळे सामना संपल्यानंतर स्कोर 3-2 असा राहिला.

आता या स्पर्धेतील भारताचा अखेरचा साखळी सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हा सामना ९ ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com