India vs Kuwait Dainik Gomantak
क्रीडा

India vs Kuwait SAFF Championship Final: टीम इंडिया नवव्यांदा बनली 'चॅम्पियन', रोमांचक सामन्यात कुवेतचा पराभव

India vs Kuwait SAFF Championship Final: भारत आणि कुवेत यांच्यात SAFF चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना बंगळुरु येथे खेळला गेला.

Manish Jadhav

India vs Kuwait SAFF Championship Final: भारत आणि कुवेत यांच्यात SAFF चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना बंगळुरु येथे खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली.

हाफ टाइमपर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत होता. यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आऊटने लागला. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने तो जिंकला. भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असा विजय मिळवला.

दरम्यान, सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने (Team India) चॅम्पियनशिपवर नाव कोरले. भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असा विजय मिळवला. विशेष म्हणजे, भारतीय फुटबॉल संघाने नवव्यांदा सॅफ चॅम्पियनशिप जिंकली. यापूर्वी, भारतीय संघाने 1993, 1997, 1999, 2005, 2009, 2011, 2015, 2021 मध्ये विजय मिळवला आहे.

दुसरीकडे, सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय फुटबॉल संघाने अंतिम फेरीत कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असा पराभव केला. विजयाचा हिरो ठरला गोलरक्षक गुरप्रीत संधू. त्याने पेनल्टी वाचवून भारताला चॅम्पियन बनवले.

यासह भारत नवव्यांदा सॅफ चॅम्पियनशिपचा विजेता ठरला. नियमित वेळेत, इंजरी आणि अतिरिक्त वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. यानंतर सामना पेनल्टीमध्ये गेला, जिथे भारतीय गोलरक्षक गुरप्रीत संधू अढळपणे उभा राहिला आणि विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला.

या स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारताने ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तान आणि नेपाळला (Nepal) पराभूत केले आणि कुवेतविरुद्ध बरोबरी साधली होती. भारतीय संघाने उपांत्य फेरीत लेबनॉनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला होता.

चांगटे यांनी भारताचे खाते उघडले

तसेच, 16 व्या मिनिटाला भारताला बरोबरी साधण्याची संधी होती, मात्र सुनील छेत्रीचा फटका कुवेतच्या गोलकीपरने रोखला. यानंतर 38 व्या मिनिटाला भारताच्या लालियानजुआला चांगटे याने गोल नोंदवून बरोबरी साधली.

स्कोअर बरोबरी झाल्यानंतर दोन्ही संघांनी आघाडी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र 90 मिनिटांपर्यंत कोणालाही आघाडी घेता आली नाही.

पहिला पेनल्टी - सुनील छेत्रीने भारताचा 1-0 गोल केला, कुवेतचा अब्दुल्ला हुकला.

दुसरा पेनल्टी - झिंगानने 2-0 गोल केला, परंतु कुवेतने गोल करुन तो 2-1 केला.

तिसरा पेनल्टी - चांगटेने भारताचा स्कोअर 3-1 असा केला आणि दुसरीकडे कुवेतने गोल करुन 3-2 अशी आघाडी घेतली.

चौथा पेनल्टी - उदांता हुकला, त्यानंतर कुवेतच्या मेहरानने गोल करुन स्कोअर 3-3 असा बरोबरीत आणला.

पाचवा पेनल्टी - भारत आणि कुवेत या दोघांनाही चेंडू नेटमध्ये पोहोचवता आला आणि स्कोअर 4-4 असा बरोबरीत राहिला.

यानंतर भारताच्या महेशने सडन डेथमध्ये गोल केला तर दुसरीकडे गुरप्रीतने पेनल्टी वाचवली आणि यासह भारताने विजेतेपद पटकावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT