Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs HK: शाह, शुक्ला अन् त्रिवेदी; या खेळाडूंपासून रोहित सेना सावधान !

India vs Hong Kong Asia Cup 2022: आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धमाकेदार स्टाईलमध्ये पराभव केला.

दैनिक गोमन्तक

India vs Hong Kong Asia Cup 2022: आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धमाकेदार स्टाईलमध्ये पराभव केला. आज (31st August) भारतीय संघाला हाँगकाँगसारख्या कमकुवत संघाशी मुकाबला करायचा आहे. टीम इंडिया आणि हाँगकाँग यांची तुलनाच होऊ शकत नाही. परंतु हाँगकाँगमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, जे भारतासाठी धोकादायक ठरु शकतात. अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा चेहरा-मोहरा बदलण्यात हे खेळाडू पटाईत आहेत. हाँगकाँगच्या या खेळाडूंपासून रोहित सेनेला सतर्क राहावे लागणार आहे. जाणून घेऊया या खेळाडूंबद्दल...

1. किंचित शहा

किंचित शाहला अष्टपैलू खेळाडू म्हणून हाँगकाँग संघात स्थान मिळाले आहे. किंचितचा जन्म 9 डिसेंबर 1995 रोजी मुंबईत झाला. त्यानंतर तो हाँगकाँगमध्ये स्थायिक झाला. भारताविरुद्धच्या सामन्यात हाँगकाँगच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश केला जाऊ शकतो. त्याला टी-20 क्रिकेट खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्याने 43 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 633 धावा केल्या आहेत.

2.आयुष शुक्ला

आयुष शुक्लाचा (Ayush Shukla) गोलंदाज म्हणून हाँगकाँग संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने आतापर्यंत पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने पाच विकेट्स घेतल्या आहेत. T20 क्रिकेटमध्ये (T20 Cricket) तो शानदार गोलंदाजी करतो. तो खूप किफायतशीर देखील आहेत. UAE विरुद्ध त्याने 30 धावांत 3 महत्त्वाचे बळी घेतले होते. अशा स्थितीत भारतीय फलंदाजांनी या खेळाडूपासून सावध राहण्याची गरज आहे.

3. अहान त्रिवेदी

17 वर्षीय अहान त्रिवेदीला (Ahan Trivedi) आशिया कपसाठी हाँगकाँग (Hong Kong) संघात स्थान मिळाले आहे. हाँगकाँग संघाकडून त्याने अद्याप पदार्पण केलेले नाही. हाँगकाँगसाठी या खेळाडूने देशांतर्गत सर्किटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. याच कारणामुळे त्याला राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच्या खेळाबद्दल भारतीय खेळाडू अनभिज्ञ आहेत. अशा परिस्थितीत या खेळाडूला भारताविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली तर टीम इंडियाला सतर्क रहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी; वेर्णा येथे झाला अपघात

Tilak Varma: आशिया कपमध्ये कमाल, आता तिलक वर्मा करणार कॅप्टन्सी! टीमची झाली घोषणा; पाहा संपूर्ण संघ

BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

PM Surya Ghar Scheme:'पीएम सूर्य घर मुफ्‍त बिजली'च्या जागृतीला चालना, उत्तर गोवा जिल्हा समन्वय समितीच्‍या बैठकीत निर्णय

Pernem: शेतकऱ्यांसाठी घातक असलेला कायदा बदला, कुळ मुंडकार संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT