Team India Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: सराव सामन्यात भारत-इंग्लंड येणार आमने-सामने, कधी आणि कुठे पाहाणार मॅच?

India vs England: वर्ल्डकप 2023 साठी भारताचा पहिला सराव सामना इंग्लंडविरुद्ध शनिवारी रंगणार आहे.

Pranali Kodre

India vs England ICC ODI Cricket World Cup 2023 warm up Match Live Streaming Details:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे. पण या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सहभागी दहाही संघ प्रत्येकी दोन सराव सामने खेळणार आहे. सराव सामन्यांना 29 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून 3 ऑक्टोबरपर्यंत सराव सामने खेळवण्यात येणार आहेत.

भारताचा पहिला सराव सामना 30 सप्टेंबर रोजी इंग्लंडविरुद्ध रंगणार आहे. या सराव सामन्याने भारत आणि इंग्लंड वर्ल्डकपसाठी अंतिम तयारी सुरू करतील. दोन्ही संघ या सराव सामन्यासाठी गुवाहाटीला पोहचले आहेत.

दरम्यान, हा सराव सामन्याने असल्याने या सामन्याला अधिकृत सामन्याचा दर्जा मिळणार नाही, त्यामुळे दोन्ही संघ आपले सर्व 15 खेळाडू या सामन्यात खेळवू शकतात. त्यामुळे दोन्ही संघांना आपापल्या संघातील खेळाडूंना आजमावण्याची चांगली संधी मिळणार आहे.

भारतीय संघ आपल्याच देशात खेळत असल्याने त्यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे. पण असे असले तरी इंग्लंडकडे जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रुक, जॉस बटलर, डेव्हिड मलान, हॅरी ब्रुक असे फलंदाज आणि मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, बेन स्टोक्स असे आक्रमक फलंदाजी करणारे अष्टपैलू आहेत.

तसेच इंग्लंड संघात सॅम करन, मार्क वूड, ख्रिस वोक्स हे गोलंदाजही आहेत. त्यामुळे इंग्लंडचा अनुभवी संघ पाहाता भारतीय संघाचाही कस लागू शकतो, तसेच भारताला सुरुवातीलाच तगडे आव्हान असल्याने त्यादृष्टीने तयारी करण्याचीही संधी मिळू शकते.

याबरोबर इंग्लंडलाही यजमान भारताविरुद्ध खेळून वर्ल्डकपच्या दृष्टीने संघसंयोजन आणि खेळाडूंना आजमवून पाहाण्याची चांगली संधी आहे.

भारतीय संघातही रोहित शर्मा, विराट कोहली या अनुभवी फलंदाजांबरोबरच शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन असे फलंदाज आहेत, तर गोलंदाजीत मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव या गोलंदाजांबरोबरच अनुभवी रविंद्र जडेजा आणि आर अश्विन देखील आहेत.

त्यामुळे या सामन्यात कोण वरचढ ठरणार हे पाहाणे चाहत्यांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड सराव सामन्याचा तपशील

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सराव सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार?

  • भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सराव सामना 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

किती वाजता सुरु होणार भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सराव सामना?

  • भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सराव सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सराव सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर आणि ऑनलाईन कसे पाहाता येईल?

  • भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सराव सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर दिसणार आहे. तसेच डिज्नी+हॉटस्टार या ऍप किंवा वेबसाईटवरही या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहाता येणार आहे.

दोन्ही संघ -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

  • इंग्लंड - जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT