Team India Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs IND 3rd ODI: लॉर्ड्सवर टीम इंडियाची नवी रणनिती? ईशान-सुंदर बाहेर, 'या' दोन दिग्गजांची होणार एन्ट्री; पाहा संभाव्य Playing XI

England vs India 3rd ODI Lords 2026: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका सध्या अत्यंत अटीतटीच्या वळणावर येऊन पोहोचली.

Manish Jadhav

England vs India 3rd ODI Lords 2026: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका सध्या अत्यंत अटीतटीच्या वळणावर येऊन पोहोचली. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक विजय मिळवला असून, आता मालिकेचा अंतिम आणि निर्णायक सामना उद्या (19 जुलै) भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाणार आहे. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्यामुळे या सामन्यातील तणाव आणि उत्सुकता शिगेला पोहोचली.

लॉर्ड्सच्या या ऐतिहासिक मैदानावर जो संघ बाजी मारेल, तोच या मालिकेचा खरा मानकरी ठरेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हे पारंपरिक क्रिकेट युद्ध पुन्हा एकदा अशा वळणावर आले, जिथे चाहत्यांचा थरार द्विगुणित झाला.

या करो या मरो च्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये दोन मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल केले जाण्याची दाट शक्यता आहे. अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज के. एल. राहुल, जो अचानक आजारी पडल्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्याला मुकला होता, तो आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून त्याचे संघात थेट पुनरागमन निश्चित मानले जात आहे.

राहुलच्या अनुपस्थितीत कार्डिफ येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात ईशान किशनने (Ishan Kishan) यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती, परंतु तो फलंदाजीत अपयशी ठरला आणि अवघ्या 8 चेंडूत 1 धाव करुन बाद झाला. आता राहुल पूर्णपणे फिट झाल्यामुळे ईशान किशनला प्लेइंग 11 मधून बाहेर पडावे लागेल. के. एल. राहुलच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाच्या मधल्या फळीला कमालीची स्थिरता आणि अनुभवाची साथ मिळणार आहे.

दुसरीकडे, अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे या महत्त्वाच्या निर्णायक सामन्यातून बाहेर पडला. दुसऱ्या वनडे सामन्यात फलंदाजी करताना 33व्या षटकात धाव पूर्ण करताना त्याला दुखापत झाली होती. सुंदरच्या अनुपस्थितीमुळे भारताच्या खालच्या मधल्या फळीतील फलंदाजी कमकुवत होऊ शकते, तसेच संघ एका चांगल्या ऑफ-स्पिनरच्या पर्यायाला मुकणार आहे. ही उणीव भरुन काढण्यासाठी संघ व्यवस्थापन चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवचा संघात समावेश करु शकते.

कुलदीप यादव आणि अक्षर पटेल ही जोडी मधल्या षटकांमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्यासाठी आणि विकेट्स चटकावण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. या महामुकाबल्यासाठी भारताच्या संभाव्य संघात रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश असू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रस्ता सुरक्षेपेक्षा दंडवसुलीला सरकारचे प्राधान्य; 22 ब्लॅकस्पॉटची दुरुस्त कधी? 1,520 मृत्यूंबाबत काँग्रेस सेवा दलाचे सवाल

Thivim Theft: थिवीत वीजतारांवर डल्ला! 83 हजार 437 रुपयांचा मुद्देमाल चोरीला; पश्चिम बंगालमधील 21 वर्षीय संशयिताला अटक

Chikhal Kalo Festival: माशेलचा चिखलकाला; सरकारी राज्योत्सव

Velsao railway track: वेळसावात रेलमार्गावरून तणाव, 'जेसीबी'ने खडी हटविण्याचा प्रयत्न; पोलिसांशी वाद

खरी कुजबूज: मुख्यमंत्री पाठीराखे

SCROLL FOR NEXT