WTC 2023 Final Dainik Gomantak
क्रीडा

WTC 2023 Final Weather Updates: पाऊस करणार का भारत-ऑस्ट्रेलियाचा गेम? असे आहेत चौथ्या दिवसाचे हवामान अंदाज

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 अंतिम सामन्या अखेरच्या दोन दिवशी पावसाचा अडथळा येऊ शकतो का? वाचा हवामान अंदाज

Pranali Kodre

India vs Australia, WTC 2023 Final, Weather Updates: कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील द ओव्हल मैदानावर बुधवार पासून खेळवला जात आहे. दरम्यान, लंडनमध्ये हा सामना असल्याने पावसाची भीती या सामन्यात आहे, पण पहिल्या तिन्ही दिवशी मात्र पावसाचा अडथळा आलेला नाही.

असे असले तरी सामन्याच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी हवामानाचे काय अंदाज आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे, कारण हा सामना रोमांचक वळणावर असून अखेरचे दोन्ही दिवस दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहेत.

दरम्यान, हवामान अंदाजानुसार सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या म्हणजेच शनिवारी आणि रविवारी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी सामन्यात पावसाचा अडथळा येऊ शकतो. शनिवारी पहिल्या दोन सत्रात पावसाची मोठा धोका नाही. पण काहीसे ढगाळ वातावरण असू शकते. मात्र अखेरच्या सत्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळू शकतात.

त्याचबरोबर पाचव्या दिवशी म्हणजेच रविवारी सातत्याने सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो.

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या सामन्यात पावसामुळे एखादा दिवस वाया गेल्यास सोमवारी या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

याआधी दोन वर्षापूर्वी झालेल्या कसोटी चॅम्पियनशीपच्या पहिल्या पर्वाच्या अंतिम सामन्यातही राखीव दिवशी खेळ झाला होता 18 जून 2021 रोजी या सामन्याला सुरुवात होणार होती. मात्र पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नव्हता. त्यामुळे 23 जून या राखीव दिवशी खेळ झाला होता.

जर सामना अनिर्णत किंवा बरोबरी सुटला तर...

जर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणारा कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामन्याचा निकाल अखेरच्या दिवसापर्यंत हाती आला नाही आणि सामना अनिर्णित संपला, तर दोन्ही संघांना विभागून विजेतेपद देण्यात येणार आहे.

तसेच हा सामना जर बरोबरीत सुटला, तरी दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाणार आहे.

सामना रोमांचक वळणावर

द ओव्हलवर सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 44 षटकात 4 बाद 123 धावा केल्या आहेत. तसेच पहिल्या डावातील 173 धावांच्या आघाडीमुळे ऑस्ट्रेलिया 296 धावांनी पुढे आहे.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 469 धावा केल्या आहेत. तसेच भारताला पहिल्या डावात सर्वबाद धावा 296 करता आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT