Mitchell Starc Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS 2nd ODI: मिशेल स्टार्क टीम इंडियाला नडला! 5 विकेट्स घेत केला 'हा' रेकॉर्ड

India vs Australia 2nd ODI: विशाखापट्टणमला होत असलेल्या वनडे सामन्यात मिशेल स्टार्कने पाच विकेट्स घेत भारतीय संघाला मोठे धक्के दिले, तसेच त्याने एका खास विक्रमाला गवसणी देखील घातली.

Pranali Kodre

Mitchell Starc 5 wickets haul: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी विशाखापट्टणमला खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशा केली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने या सामन्यात 5 विकेट्स घेत विक्रम केला आहे.

मिशेल स्टार्कने या सामन्यात 8 षटके गोलंदाजी करताना 53 धावा देत 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने रोहित शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांना बाद केले.

स्टार्कने वनडे क्रिकेटमध्ये 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची ही नववी वेळ होती. त्यामुळे वनडेत सर्वाधिक वेळा 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने ब्रेट ली आणि शाहीद आफ्रिदी यांची बरोबरी केली आहे. या दोघांनीही वनडेमध्ये 9 वेळा 5 विकेट्स हॉल घेतला आहे.

वनडेत सर्वाधिक वेळा 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर वकार युनूस आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर मुथय्या मुरलीधरन आहे. वकार युनूसने 13 वेळा असा कारनामा केला आहे, तर मुरलीधरनने 10 वेळा हा कारनामा केला आहे. महत्त्वाचे म्हणजे स्टार्कने केवळ कारकिर्दीतील 109 वा वनडे सामना खेळताना हा पराक्रम नोंदवला आहे.

स्टार्कने भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेतही शानदार कामगिरी करताना 3 विकेट्स घेतल्या होत्या.

भारताची फलंदाजी डगमगली

रविवारी झालेल्या वनडेत स्टार्कने भारताला सुरुवातीलाच मोठे धक्के दिले होते. त्याने सामन्याच्या पहिल्या 10 षटकातच 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे भारताची अवस्था 49 धावांत 5 विकेट्स अशी झाली होती. यातून भारतीय संघ फारसा सावरू शकला नाही.

भारताकडून विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला होता. पण विराटला 31 धावांवर नॅथन एलिसने बाद केलं. तर अक्षरला दुसऱ्या बाजूने कोणाची चांगली साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताचा डाव संपला, तेव्हा तो 29 धावांवर नाबाद राहिला.

भारताला या सामन्यात 26 षटकात सर्वबाद 117 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कव्यतिरिक्त सीन ऍबॉटने तीन विकेट्स घेतल्या, तसेच नॅथन एलिसने दोन विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT