Pat Cummins and Josh Hazlewood
Pat Cummins and Josh Hazlewood  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: टीम इंडियाचं टेंशन झालं कमी, स्टार्कनंतर ऑस्ट्रेलियाचा 'हा' मॅचविनर पहिल्या कसोटीतून बाहेर

Pranali Kodre

India vs Australia: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. 9 फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. मात्र, या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठे धक्के बसले आहेत. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर झाला आहे.

हेजलवूडला डाव्या पायाच्या टाचेच्या जवळ वेदना होत आहेत. त्यामुळे त्याला नागपूरला होणाऱ्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडावे लागले आहे. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिडनीमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात त्याला ही दुखापत झाली होती. त्यातून अद्याप तो सावरलेला नाही.

सध्या अलूरमध्ये ऑस्ट्रेलियाचे सराव शिबिर सुरू आहे. तिथेही हेजलवूड फार काळ गोलंदाजी करू शकला नाही. तो म्हणाला आहे की 'सिडनी कसोटीपासून अद्यापही वेदना होत आहेत.' आता तो 17 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी पूर्ण तंदुरुस्त होणार का हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल स्टार्क देखील पहिल्या कसोटीतून बोटाच्या दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. तसेच कॅमेरॉनला देखील त्याच्या बोटाच्या दुखापतीमुळे या कसोटीत गोलंदाजी करता येणार नाही.

त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाकडे वेगवान गोलंदाजीसाठी कर्णधार पॅट कमिन्सशिवाय स्कॉट बोलंड आणि लान्स मॉरीस हे दोनच पर्याय वेगवान गोलंदाजीसाठी आहेत. त्यामुळे त्यांना पहिल्या कसोटीसाठी संधी दिली जाऊ शकते.

त्यामुळे आता पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचे संघव्यवस्थापन कशा संयोजनासह मैदानात उतरणार हा मोठा प्रश्न आहे.

(Border-Gavaskar Trophy: Josh Hazlewood ruled out of the 1st match in Nagpur)

सध्या ऑस्ट्रेलिया संघ अलूरमध्ये असून कसून सराव करत आहे. या सरावादरम्यान ऑस्ट्रेलियन संघाने फिरकी गोलंदाजी खेळवण्यावर अधिक लक्ष दिले आहे. अलूरमधील चारदिवसीय सराव शिबिरानंतर ऑस्ट्रेलिया संघ नागपूरला पोहोचणार आहे.

भारतीय संघ आधीच नागपूरला पोहचला आहे. त्यांनी तिथे सरावाला सुरुवात केली आहे. दरम्यान, भारतीय संघाला सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. भारताने गेल्या तीन कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाही यंदा गेल्या तीन मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न करतील.

भारत - ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी मालिकेतील नागपूरनंतर दुसरा सामना 17 - 21 फेब्रुवारीदरम्यान दिल्लीला होणार आहे. त्यानंतर तिसरा कसोटी सामना 1-5 मार्चदरम्यान धरमशाला आणि चौथा कसोटी सामना 9-13 मार्चदरम्यान अहमदाबादला होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT