IND vs AUS: 'तो टीम इंडियाच्या बॅटिंगचा कणा...' पंतची जागा कोण घेणार प्रश्नावर अश्विनचे उत्तर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत पंतची जागा कोण भरून काढू शकतो, याबद्दल बोलताना आर अश्विनने एका खेळाडूचे भरभरून कौतुक केले आहे.
R Ashwin on Pant's absence
R Ashwin on Pant's absenceDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 9 फेब्रुवारीपासून 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ तयारीला लागले असून जोरदार सराव करत आहेत. दरम्यान, भारतीय संघात यंदा या मालिकेसाठी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत नसणार आहे.

भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील गेल्या दोन कसोटी मालिकेत पंतची भूमिका महत्त्वाची राहिली होती. त्याने दोन्ही वेळेस चांगली कामगिरी करताना भारताला विजय मिळवून दिला होता. मात्र, त्याचा डिसेंबर 2022 च्या अखेरीस कार अपघात झाला. त्यामुळे सध्या त्या अपघातात झालेल्या दुखापतीतून तो सावरत आहे. याच कारणामुळे तो या मालिकेचा भाग नसणार आहे.

आता त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघात यष्टीरक्षणासाठी ईशान किशन आणि केएस भरत यांचे पर्याय आहेत. मात्र पंतची आक्रमक फलंदाजी हा एक मोठा पैलू आहे. त्यामुळे त्याच्या फलंदाजीची कमी कोण भरून काढणार हा मोठा प्रश्न आहे. याचे उत्तर आता भारताचा फिरकीपटू आर अश्विनने दिले आहे.

R Ashwin on Pant's absence
IND vs AUS: अश्विनचा 'डुब्लिकेट'! कधी काळी विकायचा चहा, आता ऑसींना टीम इंडियाविरुद्ध करतोय मदत; Video

अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनलवर बोलताना श्रेयस अय्यरला पंतचा सर्वोत्तम पर्याय म्हटले आहे. तो म्हणाला, 'श्रेयस अय्यर गेल्या काही वर्षात पंतबरोबरच भारताचा लयीत असलेला कसोटी फलंदाज आहे. खरंतर हे त्याच्यासाठी कमी कौतुक आहे. तो भारतीय फलंदाजीचा कणा बनला आहे. तो पंतच्या अनुपस्थितीत भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे.'

दरम्यान, श्रेयस सध्या पाठीच्या दुखापतीतून सावरत असून या दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरला होणाऱ्या पहिल्या कसोटीतून बाहेर गेला असल्याचे समजत आहे. याबद्दल अश्विन म्हणाला, 'त्याला पाठीच्या दुखापतीचा त्रास होत आहे. बहुतेक त्याने इंजेक्शनही घेतले आहेत.'

R Ashwin on Pant's absence
IND vs AUS: नव्या वादाला फुटले तोंड! सिराज, उमरानचा टिळा लावण्यास नकार, Video Viral

श्रेयसच्या आत्तापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास त्याने नोव्हेंबर 2021 मध्ये भारताकडून कसोटी पदार्पण केले असून आत्तापर्यंत 7 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि 5 अर्धशतकांसह 56.72 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत. दरम्यान तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपासून उपलब्ध असेल, अशी अपेक्षा भारतीय संघाला असेल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी)

9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी - पहिली कसोटी, नागपूर

17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी - दुसरी कसोटी, दिल्ली

1 मार्च ते 5 मार्च - तिसरी कसोटी, धरमशाला

9 मार्च ते 13 मार्च - चौथी कसोटी - अहमदाबाद

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com