Ind Vs Aus Test
Ind Vs Aus TestDainik Gomantak

Ind Vs Aus Test: शुभमन! अख्खं नागपूर बोलतंय, आतातरी बघं; उमेश यादवच्या ट्विटची सर्वत्र चर्चा

भारतीय गोलंदाज उमेश यादव याने केलेल्या ट्विटची चर्चा सर्वत्र होत आहे.
Published on

भारतीय क्रिकेटपटू नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात. शुभमन गिल सध्या फडाखेबाज फंलदाजी करत असून, त्याची क्रेझ चांगलीच वाढली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या टी 20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शुभमनने आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 6 वे शतक पूर्ण केले.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगणार आहे. यापूर्वी भारतीय गोलंदाज उमेश यादव याने केलेल्या ट्विटची चर्चा सर्वत्र होत आहे. यात शुभमन गिलचा उल्लेख असल्याने हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.

Ind Vs Aus Test
IND vs AUS: नव्या वादाला फुटले तोंड! सिराज, उमरानचा टिळा लावण्यास नकार, Video Viral

काय आहे ट्विट?

उमेश यादव याने केलेल्या ट्विटमध्ये एक मुलगी हातात बॅनर घेऊन मैदानाच्या प्रेक्षक गॅलरीत उभी दिसत आहे. त्यावर टिंडर शुभमनसे मॅच करतो असे लिहले आहे. याला टिंडरने आपल्या जाहिरातीसाठी वापरून त्याच्यावर शुभमन इधर तो देख लो असे लिहिले आहे. हाच फोटो असलेले बॅनर नागपूरमध्ये विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत.

तरुणींकडून शुभमनला मिळणाऱ्या या अटेंशनवरून आता भारतीय क्रिकेटपटू उमेश यादव याने ट्विट करत त्याला ट्रोल केलं आहे. "पुरा नागपूर बोल रहाहे, शुभमन अब तो देख ले". असे ट्विट करत उमेशने शुभमनला ट्रोल केले आहे.

Ind Vs Aus Test
World Cancer Day: फक्त युवीच नाही, तर 'या' 5 क्रिकेटर्सनेही दिला कॅन्सरशी लढा

दरम्यान, अद्याप शुभमनने उमेशच्या या ट्विटला रिप्लाय दिलेले नाही. मात्र, उमेशचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

शुभमन गिलचे नाव सारा तेंडुलकर आणि सारा अली खान या दोघींशी जोडले जाते. परंतु या दोन सारांपैकी शुभमन कोणत्या साराला डेट करतोय याबाबत काहीच माहिती समोर आली नाही. अशात उमेश यादवच्या ट्विटने वेगळी चर्चा सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com