Rohit Sharma - Pat Cummins Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: भारी योगायोग! फक्त रोहितच नाही, तर ऑस्ट्रेलियन कर्णधाराचीही WTC Final मध्ये 'स्पेशल फिफ्टी'

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स यांच्या एका विक्रमाबाबत खास योगायोग जुळून आला आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma - Pat Cummins Test Records: बुधवारपासून (7 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना सुरू झाला आहे. इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर हा सामना होत आहे. हा सामना भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्ससाठी खास आहे.

रोहित आणि कमिन्स या दोघांनीही या सामन्यात खास विक्रम केला आहे. या दोघांचाही आपापल्या देशासाठी हा 50 वा सामना आहे.

रोहितने नोव्हेंबर 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर आता तो जवळपास 10 वर्षांनी त्याच्या कारकिर्दीतील 50 वा कसोटी सामना खेळत आहे. तसेच पॅट कमिन्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोव्हेंबर 2011 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर आता तो 12 वर्षांनी 50 वा कसोटी सामना खेळत आहे.

भारतासाठी 50 कसोटी सामने खेळणारा रोहित 36 वा खेळाडू आहे. तसेच ऑस्ट्रेलियासाठी 50 कसोटी सामने खेळणारा पॅट कमिन्स 55 वा खेळाडू ठरला आहे.

रोहितने जिंकली नाणेफेक

दरम्यान, कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 च्या अंतिम सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळण्याची भारताची दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2019-21 दरम्यान कसोटी चॅम्पियनशीपचे पहिले पर्व खेळवण्यात आले होते, त्या पर्वातही भारताने अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते. मात्र भारताला अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता.

तसेच ऑस्ट्रेलियाची मात्र कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

  • ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड, कॅमेरॉन ग्रीन, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलंड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT