क्रीडा

भारत अन् ऑस्ट्रेलिया World Cup 2023 मोहिमेची विजयी सुरुवात करण्यास उत्सुक! पाहा संभावित 'प्लेइंग -11'

India vs Australia: वर्ल्डकप 2023 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चेन्नईमध्ये रविवारी सामना होणार आहे.

Pranali Kodre

ICC Cricket World Cup 2023, India vs Australia, Predicted XI:

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत पाचवा सामना रविवारी (8 ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळवला जाणार आहे. या सामन्याने हे दोन्ही संघ आपली मोहित सुरु करणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघ रविवारी विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील.

हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना आपल्या संघातील दुखापतग्रस्त आणि आजारी खेळाडूंची चिंता आहे.

भारताचा सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यू झाला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसला हॅमस्ट्रिंगची दुखापत आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात या दोघांच्याही खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.

दरम्यान, गिलच्या अनुपस्थितीत इशान किशन भारताकडून कर्णधार रोहित शर्मासह डावाची सुरुवात करू शकतो. तसेच मधल्या फळीत विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल यांचा समावेश असू शकतो.

याबरोबरच हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा हे अष्टपैलू खेळाडू फलंदाजीला सखोलता देतील. हार्दिक आणि जडेजा गोलंदाजीही जबाबदारी पेलताना दिसतील. हार्दिकमुळे भारताला वेगवान गोलंदाजीत एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. त्याचमुळे भारताला तीन फिरकी गोलंदाजांना खेळण्याचे स्वातंत्र मिळते, असे मत सामन्यापूर्वी रोहित शर्मानेही मांडले आहे.

त्याचबरोबर जडेजासह फिरकी गोलंदाजीसाठी आर अश्विन आणि कुलदीप यादव हे पर्याय असतील. अश्विन त्याच्या घरच्या मैदानात खेळताना दिसू शकतो. तसेच वेगवान गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते.

ऑस्ट्रेलियाबाबत सांगायचे झाल्यास डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श सलामीला उतरू शकतात. तसेच स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्युशेन मधली फळी सांभाळताना दिसू शकतात. त्यांना अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरॉन ग्रीनची साथ मिळू शकते.

तसेच यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ऍलेक्स कॅरी खेळू शकतो. तसेच कर्णधार पॅट कमिन्स, जोश हेजलवूड आणि मिचेल मार्श वेगवान गोलंदाजी सांभाळतील, तर ऍडम झम्पा फिरकी गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळवू शकतो.

संभावित प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेडा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

  • ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेजलवूड, मिचेल स्टार्क, ऍडम झम्पा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT