KL Rahul - Athiya Shetty Dainik Gomantak
क्रीडा

KL Rahul Video: टीम इंडियातील जागा धोक्यात आलेला केएल ईश्वर चरणी! पत्नीसह घेतलं महाकालचं दर्शन

केएल राहुल पत्नी अथिया शेट्टीसह महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेला होता, यादरम्यानचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Pranali Kodre

KL Rahul Visits Mahakaleshwar Temple: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मात्र, या मालिकेतील दुसरा सामना तीन दिवसातच संपल्याने खेळाडूंना तिसऱ्या कसोटीपूर्वी विश्रांतीसाठी अधिक काळ मिळाला. या दरम्यान, काही खेळाडू छोट्या ट्रीपवरही गेले होते, तर काही खेळाडूंनी कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याला प्राधान्य दिले.

याच काळात भारताचा फलंदाज केएल राहुल त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसह देवदर्शन केले. या दोघांचे गेल्याच महिन्यात 22 जानेवारी 2023 रोजी लग्न झाले आहे. त्यानंतर लगेचच केएल राहुल भारतीय संघात सामील झाला होता.

दरम्यान, केएल राहुल आणि अथिया यांनी रविवारी उज्जैनमधील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदीराला भेट दिली. यावेळी त्यांनी तिथे पूजाही केली. दर्शनावेळी केएल राहुल आणि अथिया दोघांनीही पारंपारिक वेश परिधान केलेला होता.

त्यांच्या या मंदीराच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान काही युजर्सने केएल राहुल सध्या खराब फॉर्मचा सामना करत असल्याने देवदर्शनासाठी गेल्याचेही म्हटले आहे.

केएल राहुलवर संघातील जागा गमवण्याचे संकट

केएल राहुल सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्याला गेल्या काही सामन्यांमध्ये मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीकाही केली आहे. तसेच अनेक क्रिकेट तज्ञांनी त्याच्याऐवजी आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित दोन्ही सामन्यांसाठी शुभमन गिलला रोहितसह सलामीला संधी द्यावी, असे म्हटले आहे.

केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही कसोटीतील तीन डावात मिळून केवळ 38 धावा केल्या आहेत. तसेच त्याला गेल्या 10 कसोटी डावा एकदाही अर्धशतक करता आलेले नाही. त्यामुळे आता त्याच्यावर प्लेइंग इलेव्हनमधील जागा गमवण्याचे संकट आले आहे.

महत्त्वाचे म्हणजे त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याने भारतीय संघाचे उपकर्णधारपदही गमावले आहे.

भारतीय संघ मालिकेत आघाडीवर

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पहिले दोन्ही कसोटी सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघाने 2-0 अशी मालिकेत आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता भारताला मालिका विजयाची संधी आहे, तर ऑस्ट्रेलियाला मालिका वाचवण्यासाठी पुढील दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा सामना 1 मार्चपासून इंदोरला होणार आहे, तर चौथा सामना 9 मार्चपासून अहमदाबादला होणार आहे. त्यानंतर या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT