KL Rahul
KL RahulDainik Gomantak

KL Rahul: खराब कामगिरीमुळे केएल राहुलला उपकर्णधार पदावरून हटवले

बीसीसीआयने रविवारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली
Published on

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल त्याच्या खराब कामगिरीमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. गेल्या काही डावांत त्याला अर्धशतक झळकावता आलेले नाही. कसोटीत फलंदाजीतील खराब कामगिरीमुळे केएल राहुलला उपकर्णधारपदावरून हटवण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली. भारताच्या सर्वोच्च क्रिकेट मंडळाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली. गेल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघातील एक बदल म्हणजे केएल राहुलला भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून वगळण्यात आले आहे.

KL Rahul
I-League Football: चर्चिल ब्रदर्सला पराभूत करत गोकुळम केरळने विजयाची संधी साधली

बीसीसीआयने गेल्या महिन्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली तेव्हा त्यात केएल राहुल संघाचा उपकर्णधार होता. तथापि, रविवारी बीसीसीआयने केएल राहुलचे संघाचे उपकर्णधारपद काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. आता तो केवळ नियमित खेळाडू म्हणून भाग घेईल असे दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com