Venkatesh Prasad | Rohit Sharma | KL Rahul | Rahul Dravid
Venkatesh Prasad | Rohit Sharma | KL Rahul | Rahul Dravid Dainik Gomantak

KL Rahul बरोबरच आता द्रविड, रोहितवरही वेंकटेश प्रसादचा निशाणा! थेट आकडेवारीतूनच आणलं सत्य बाहेर

वेंकटेश प्रसादने सोमवारी केएल राहुलवर पुन्हा एकदा निशाणा साधताना रोहित शर्मा आणि राहुल द्रविडलाही फटकारले आहे.
Published on

Venkatesh Prasad criticized KL Rahul: भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असेलल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातही त्याला 1, 17 आणि 20 अशा धावांच्या खेळी केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या संघातील जागेवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून त्याला टीकांचाही सामना करावा लागत आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादने तर गेल्या 10 दिवसात अनेक ट्विट करत त्याच्यावर टीकास्त्र सोडली आहेत. त्याने टीका करताना केएल राहुलची आकडेवारीही सांगितली आहे. प्रसादला त्याच्या ट्वीटवर संमिश्र प्रतिक्रियाही आल्या आहेत.

पण याचदरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केएल राहुलला पाठराखण केली आहे. तसेच त्यांनी त्याला पाठिंबा देताना त्याची परदेशातील कामगिरी चांगली झाली असल्याचे सांगितले होते. तसेच रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारतीय संघात केएल राहुलला कायम करण्यात आले आहे.

Venkatesh Prasad | Rohit Sharma | KL Rahul | Rahul Dravid
Venkatesh Prasad: 'तो टॉप 10 ओपनर्समध्येही...': KL राहुल पुन्हा प्रसादच्या निशाण्यावर

मात्र, आता रोहित आणि द्रविड यांच्या पाठिंब्यानंतर वेंकटेश प्रसादने सोमवारी पुन्हा एकदा केएल राहुलवर टीका केली आहे. इतकेच नाही, तर राहुलची कसोटीतील मायदेशातील आणि परदेशातील आकडेवारी सादर करताना प्रसादने द्रविड आणि रोहित यांनाही अप्रत्यक्षरित्या फटकारले आहे. तसेच त्याने केएल राहुलच्या तुलनेत शिखर धवन, मयंक अगरवाल, अजिंक्य रहाणे यांची आकडेवारीही सादर केली आहे.

वेंकटेश प्रसादने सोमवारी केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये केएल राहुलची आकडेवारी सादर करताना लिहिले की 'एक विचार असा आहे की केएल राहुलची परदेशातील कसोटी आकडेवारी उत्तम आहे. पण आकडेवारी काही वेगळे सांगते. त्याची परदेशात खेळलेल्या 56 कसोटी डावात 30 ची सरासरी आहे. त्याने परदेशात 6 शतके केली आहेत. पण त्यानंतर त्याने सातत्याने कमी धावांच्या खेळी केल्या आहेत. त्याचमुळे 30 ची सरासरी आहे. आपण बाकी खेळाडूंचीही आकडेवारी पाहू.'

पुढे प्रसादने शिखर धवनची कसोटीतील आकडेवारी सादर करताना लिहिले, 'शिखर धवनची सध्या सलामीवीरांमध्ये परदेशातील सर्वोत्तम सरासरी आहे. त्याची 5 शतकांसह जवळपास 40 ची सरासरी आहे. पण, तो देखील कसोटीत सातत्यपूर्ण नाही, पण त्याने श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्ध शानदार शतके केली आहेत. तसेच त्याची मायदेशातील कामगिरीही चांगली झाली आहे.'

पुढे प्रसादने मंयक अगरवालबद्दल ट्वीट केले की 'मयंक अगरवालच्या कारकिर्दीची ऑस्ट्रेलियात चांगली सुरुवात झाली होती. पण त्यानंतर त्याने परदेशात संघर्ष केला. मात्र, त्याची मायदेशातील आकडेवारी खूप चांगली आहे.'

'त्याने मायदेशात 13 डावात जवळपास 70 च्या सरासरीने धावा केल्या असून 2 द्विशतके आणि एक दीडशतक ठोकले आहे. हे दीडशतक त्याने वानखेडे स्टेडियमवरील अशा खेळपट्टीवर ठोकले, ज्यावर इतरांनी संघर्ष केला होता. तो फिरकी गोलंदाजी चांगली खेळतो आणि नुकताच त्याच्यासाठी देशांतर्गत हंगाम शानदार राहिला.'

याशिवाय प्रसादने शुभमन गिलही चांगला पर्याय असल्याचे सुचवताना ट्वीट केले आहे की 'शुभमन गिलची आंतरराष्ट्रीय कारकिर्द अजून लहान आहे, त्याने परदेशात 14 डाव खेळले असून त्याची 37 ची सरासरी आहे. यामध्ये गॅबावर त्याने खेळलेल्या 91 धावांच्या खेळीचाही समावेश आहे, जी चौथ्या डावातील सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्येही आहे.

Venkatesh Prasad | Rohit Sharma | KL Rahul | Rahul Dravid
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया टेंशनमध्ये! कमिन्स मायदेशी परतल्यावर आता 'हा' मॅचविनरही भारत दौऱ्यातून बाहेर

प्रसादने रहाणेचेही उदाहरण दिले आहे. त्याने लिहिले की 'आणि जर परदेशातील कामगिरी हा निकष असेल, तर अजिंक्य रहाणेला जरी फॉर्ममध्ये नसला आणि त्याला वगळण्यापूर्वी त्याच्यात सातत्यही नसले, तरी त्याचे परदेशातील कसोटी आकडेवारी चांगली आहे. त्याची पदेशात ५० कसोटी सामन्यांत ४० पेक्षा जास्तीची सरासरी आहे. त्यालापण खराब फॉर्मनंतर वगळण्यात आले.

अखेरीस वेंकटेश प्रसादने ट्विट केले आहे की 'पण केएल राहुलच्या बाबतीत त्याला पुढील दोन सामन्यांसाठीही कायम करण्यात आले आहे. जर त्याला इंदोरला होणाऱ्या पुढच्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळायला मिळाले, तर माझ्यासारख्या टिकाकारांचे तोंड बंद करण्याची त्याच्याकडे सर्वोत्तम संधी असेल. नाहीतर त्याला काउंटी क्रिकेट खेळण्याची गरज आहे आणि चांगली कामगिरी करून कसोटीत पुनरागमन करावे लागेल.'

दरम्यान, केएल राहुलला जरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात कायम करण्यात आले असले, तरी त्याला कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com