India vs Australia | World Cup Final ICC
क्रीडा

IND vs AUS: भारत काढणार वीस वर्षांपूर्वीच्या वर्ल्डकप पराभवाचा वचपा? कधी अन् कुठे पाहाणार फायनल, जाणून घ्या

India vs Australia, World Cup Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी अंतिम सामना रंगणार आहे.

Pranali Kodre

India vs Australia ICC ODI Cricket World Cup 2023 Final Live Streaming:

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) रंगणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 

या अंतिम सामन्याआधी भारताने सलग 10 विजय मिळवले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने सलग 8 सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. त्यामुळे या दोन्ही संघात रोमांचक सामना होईल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या दोन्ही संघांनी आपली यंदाच्या वर्ल्डकपमधील मोहिम एकमेकांविरुद्ध खेळून सुरू केली होती आणि आता वर्ल्डकपची अखेरही या दोन संघातील सामन्याने होणार आहे.

8 ऑक्टोबर रोजी चेन्नईला या दोन संघात सामना झाला होता, ज्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला होता. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ 20 वर्षांनी वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भिडणार आहेत.

यापूर्वी 2003 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हे दोन संघ आमने-सामने उभे ठाकले होते, ज्यात ऑस्ट्रेलियाने 125 धावांनी विजय मिळवला होता. आता या पराभवाचा वचपा भारतीय संघ काढणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

दरम्यान, भारतीय संघ चौथ्यांदा वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळणार आहे, तर ऑस्ट्रेलिया आठवयांदा वर्ल्डकपता अंतिम सामना खेळणार आहे. तसेच भारत तिसऱ्यांदा, तर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा वर्ल्डकप विजयासाठी प्रयत्नशील असणार आहे.

भारताने यापूर्वी 1983 आणि 2011 साली वर्ल्डकप जिंकला आहे, तर ऑस्ट्रेलियाने 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 या पाच वर्षी वर्ल्डकप जिंकला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याचा तपशील

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार?

    • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

  • किती वाजता सुरु होणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना?

    • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर आणि ऑनलाईन कसे पाहाता येईल?

    • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर दिसणार आहे. तसेच डिज्नी+हॉटस्टार या ऍप किंवा वेबसाईटवरही या सामन्याचे लाईव्ह मोफत प्रक्षेपण पाहाता येणार आहे.

यातून निवडली जाणार प्लेइंग इलेव्हन

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, प्रसिध कृष्णा.

  • ऑस्ट्रेलिया - पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ऍलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन ऍबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅब्युशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झाम्पा, मिचेल स्टार्क.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT