World Cup 2023: भारत-ऑस्ट्रेलिया फायनलसाठी BCCI ची जय्यत तयारी! 'या' सेलिब्रेटिंचा होणार परफॉर्मन्स

India vs Australia Final: वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान काही खास परफॉर्मन्स होणार आहेत, याबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे.
India vs Australia | World Cup Final
India vs Australia | World Cup Final

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Australia Final Ceremony:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात रंगणार आहे. हा सामना रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे, तर 1.30 वाजता सामन्यासाठी नाणेफेक होईल.

या सामन्यादरम्यान स्पर्धेचा समारोप सोहळाही रंगणार आहे. या कार्यक्रमाची रुपरेषा बीसीसीआने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

India vs Australia | World Cup Final
World Cup 2003 Final: भारताविरुद्ध शतक ठोकताना पाँटिंगने ड्रेसिंग रुमला काय पाठवलेला मेजेस? वाचा इनसाईड स्टोरी

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार रविवारी नाणेफेकीनंतर दुपारी 1.35 वाजल्यापासून 1.50 वाजेपर्यंत भारतीय हवाई दलाचा सूर्यकिरण एरोबॅटिक संघाचा एअर शो होणार आहे. त्यानंतर पहिल्या डावातील ड्रिंक्स ब्रेक दरम्यान आदित्य गधवीचा परफॉर्मन्स होणार आहे.

तसेच पहिल्या डावानंतरच्या ब्रेकमध्ये प्रीतम चक्रवर्ती, जोनिता गांधी, नकाश अझीझ, अमित मिश्रा, आक्सा सिंग आणि तुषार जोशी या सेलिब्रेटिंचा परफॉर्मन्स होणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या डावाच्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये लेझर आणि लाईट शो होणार आहे.

पंतप्रधानांची उपस्थिती?

या सामन्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर दोन्ही देशाचे काही मोठे अधिकारीही उपस्थित राहू शकतात.

India vs Australia | World Cup Final
World Cup 2023: भारत-ऑस्ट्रेलिया फायनल खेळणार, पण मार्शने IPL दरम्यान केलेली 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

बारा वर्षांनी भारत अंतिम सामन्यात

भारतीय संघाने तब्बल 12 वर्षांनी वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. यापूर्वी भारताने 2011 साली वनडे वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला होता आणि जिंकला होता.

तसेच भारतीय संघाने अंतिम सामना खेळण्याची ही चौथी वेळ असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाची आठवी वेळ असणार आहे. दरम्यान, भारत तिसऱ्यांदा, तर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा वर्ल्डकप विजयासाठी प्रयत्नशील असणार आहे.

भारताने यापूर्वी 1983 आणि 2011 साली वर्ल्डकप जिंकला आहे, तर ऑस्ट्रेलियाने 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 या पाच वर्षी वर्ल्डकप जिंकला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com